ऑगस्ट महिना संपत आला असून येत्या १ सप्टेंबर २०२६पासून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. यामध्ये LPG e-KYC, आयकर विवरणपत्र, मोठ्या मुदतीच्या ठेवी, (citizens) तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या प्रक्रियेशी संबंधित बदलांचा समावेश आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच या नियमांची माहिती घेणे नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी इमिग्रेशन प्रक्रिया अधिक सोपी होण्याची शक्यता आहे. १ सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बोर्डिंग पासवर इमिग्रेशन स्टॅम्प घेण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. मोबाईलवरील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा त्याची प्रिंट दाखवून प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. करदात्यांसाठीही ऑगस्टअखेर महत्त्वाची आहे. Assessment Year 2026-27 साठी ऑडिटची आवश्यकता नसलेल्या करदात्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ITR दाखल करण्याची मुदत आहे. (citizens) त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी विवरणपत्र भरून घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, मोठ्या रकमेच्या FD संदर्भातही नियमांमध्ये बदल होणार आहेत. ३ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींवरील व्याजदरांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी बँकांना संबंधित माहिती अधिक स्पष्टपणे उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. (citizens) याशिवाय LPG ग्राहकांसाठी e-KYC प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत e-KYC पूर्ण न केल्यास पुढील काळात घरगुती LPG सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला LPG, इंधन आणि इतर शुल्कांमध्ये होणारे संभाव्य बदलही नागरिकांच्या खर्चावर परिणाम करू शकतात.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?