मुस्लिम नाटो राष्ट्राचा फार्स?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

भारत आणि सायप्रस मध्ये झालेला करार, आणि द्विपक्षीय संबंध संवर्धनावर झालेली चर्चा, बलुचिस्तान कडून स्वतंत्र राष्ट्राची करण्यात आलेली घोषणा, पी. ओ. के. मधील चिघळलेली स्थिती, अंतर्गत असंतोष, तिजोरीतील खडखडाट, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुढाकार घेऊन संपन्न केलेली मक्का परिषद, (declaration) त्यातून मुस्लिम राष्ट्रांनी एका झेंड्याखाली येण्याचे केलेले आवाहन, तुर्की आणि सौदी अरेबिया या दोघांनी एकाच वेळी एकत्र येऊन दिलेला प्रतिसाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव गट स्थापन करण्याचा प्रयत्न असला तरी ही तिन्ही मुस्लिम राष्ट्रे आहे सध्या घाबरलेल्या स्थितीत आहेत. आणि घाबरलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय हा फार्स ठरतो.

तुर्कीने सायप्रस चा बराचसा भाग आपल्या कब्जात घेतला आहे. अशावेळी सायप्रसला भरवशाचा मित्र म्हणून भारत हवा आहे. त्यातूनच भारत आणि सायपरस एकत्र आले आहेत आणि भारताने तुर्कीला याद राखा! आमच्याशी पंगा घ्याल तर असा संदेश दिला आहे. तुर्कीची अर्थव्यवस्था ढेपाळलेली आहे. (declaration) त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांना त्यांना ग्राहक हवा आहे. आणि हा ग्राहक पाकिस्तान आहे. सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यात संघर्ष आहे. आणि पाकिस्तानला अंतर्गत बंडाळीला सामोरे जायचे आहे. एकमेकांची निकडीची गरज म्हणून तिन्ही देश मक्का या पवित्र शहरात एकत्र आले होते.कुठल्याही एका राष्ट्रावर हल्ला झाला तर तो इतर दोन्ही राष्ट्रांवर हल्ला झाला आहे असे मक्का परिषदेत ठरवले गेले आहे. असहायतेतून एकत्र आलेल्या या राष्ट्रांना उर्वरित मुस्लिम राष्ट्रे समर्थन देतील हे अशक्य आहे. मुस्लिम राष्ट्रांची संघटना होणे शक्य नाही पण झालीच तर पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे मुस्लिम नाटो संघटनेचे नेतृत्व पाकिस्तान कडे येईल. पश्चिम आशियातील बरेचसे मुस्लिम देश हे अमेरिकेच्या पंखाखाली आहेत.

सौदी अरेबिया सुद्धा अमेरिकेचा मांडलिक देश आहे.यापूर्वी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे एकत्र आले होते. पण जेव्हा सौदीवर इरांणकडून हल्ले झाले तेव्हा पाकिस्तानने सौदी शी मैत्रीचा व्यवहार पाडलेला नव्हता. समजा मुस्लिम नाटो सदृश्य संघटनेमध्ये इराण आला तर सौदी आणि पाकिस्तानची तसेच तुर्कीची अवस्था काय होईल?मक्का परिषद झाल्यानंतर तुर्की आणि सौदी अरेबियाची लष्करी विमाने पाकिस्तानच्या हवाई तळावर उतरलेली आहेत. त्यातून तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर ड्रोन पाठवले आहेत आणि ड्रोन बनवण्याची तांत्रिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीनेही पाकिस्तानला लष्करी मदत पाठवलेली आहे.कधी गोपनीयता राखून तुर्की व सौदीची विमाने पाकिस्तानच्या भूमीवर लँड झालेली आहेत, आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानला दिलेली आहेत हे ओपन सिक्रेट आहे.

सप्टेंबर महिन्यात भारतात ब्रिक्स राष्ट्रांची परिषद होते आहे. चीन आणि रशिया यांच्यासह आणखी बरेच देश भारतात येणार आहेत. भारतातील या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान शस्त्र सज्ज होताना दिसतो आहे.भारताने अफगाणिस्तानला मालवाहू विमानातून औषधे पाठवली होती. पण औषधाचा बहाणा करून भारताने तालिबान्यांना शस्त्रे पुरवलेली आहेत असा दावा पाकिस्तान करतो आहे. (declaration) याशिवाय पीओके मध्ये आणि बलुचिस्तान मध्ये सध्या जे काही चालले आहे ते भारताच्या आशीर्वादाने सुरू आहे असे पाकिस्तानचे राज्यकर्ते उघडपणे बोलून दाखवत आहेत.

सर्व पातळीवरचे अपयश झाकून टाकण्यासाठी, सिंधू जल कराराचे निमित्त करून भारतीय सीमेवर लष्करी हालचाली वाढवण्याच्या प्रयत्नात शहाबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर हे आहेत. तुर्की कडून मिळालेल्या ड्रोन चा वापर बलुचिस्तानमध्ये केला जाऊ शकतो. एकूणच पाकिस्तान, तुर्कीस्तान आणि सौदी या तीन देशांकडे सुमारे 25 लाख खडे सैन्य आहे, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आहे प्रसंगी आम्ही अन्न वस्त्र चा वापर करू शकतो असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. पण हे सैन्य पोटावर चालते हे त्यांना माहीत नसावे. मका परिषद म्हणजे एकमेकांची गरज म्हणून एकत्र आलेले तीन देश असे म्हणता येईल.

हेही वाचा :

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?

नशामुक्त सांगलीसाठी संकल्प करा?