कोल्हापुरात ५ सप्टेंबरला दहीहंडीचा थरार विजेत्या संघाला ३ लाखाचे बक्षीस?

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात यंदाही दहीहंडीचा थरार आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे. धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Dahi Handi) त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये आतापासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात गाजलेल्या युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत यंदाही विविध गोविंदा पथकांमध्ये ३ लाख रुपयांचे बक्षीस पटकावण्यासाठी जोरदार चुरस रंगणार आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज होणार असून, दसरा चौकात थरारक क्षण अनुभवायला मिळणार आहेत.यंदाच्या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल १० लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच देण्यात येणार आहे. (Dahi Handi) त्यामुळे स्पर्धेतील उत्साहासोबतच गोविंदांच्या सुरक्षेलाही महत्त्व देण्यात आले आहे. दरवर्षी कोल्हापुरात युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला मोठी गर्दी होत असते. यंदाही दसरा चौकात होणाऱ्या या स्पर्धेमुळे शहरात दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळणार असून, ३ लाख रुपयांचे बक्षीस कोणते गोविंदा पथक पटकावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?

राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?

एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?