विरोधकांना कसे सामोरे जायचे? भारतीय जनता पक्षाचे आत्मचिंतन?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

सोशल मीडियासह उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा अगदी प्रभावीपणे वापर करण्यात माहिर असलेल्या भारतीय जनता पक्षाला”विषया”च्या लढाईत विरोधकांनी मागे टाकले असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची जाहीरपणे कबुली दिली आहे. पुणे येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत नजीकच्या काळात विरोधकांना कसे सामोरे जायचे याचे जाहीर आत्मचिंतन करण्यात आले. जंतर-मंतर नंतर घडलेल्या गेल्या दोन महिन्यातील घटनांची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अगदी निर्धारपूर्वक महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील माओवाद अर्थात नक्षलवादी चळवळ संपुष्टात आणली आहे. (opposition) याच दरम्यान “अर्बन नक्षलवाद”हा शब्दप्रयोग भाजपने केला होता आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी”दिमागी नक्षलवाद”असा उल्लेख इंडिया आघाडीला उद्देशून केला होता. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारणीच्या बैठकी चा समारोप करताना काँग्रेसला उद्देशून लाल संविधानाचे छुपे समर्थक असे म्हटले आहे. इंडिया आघाडीपेक्षा राहुल गांधी यांची काँग्रेस हेच भाजपला आगामी निवडणुकीत आव्हान असणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले असल्यामुळे काँग्रेस विरोधी रणनीती काय असली पाहिजे यासंबंधीचे मार्गदर्शन फडणवीस यांच्याकडून झाले आणि ते स्वाभाविक होते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान धोक्यात आहे या एकाच मुद्द्यावर प्रचार सभेत रान उठवले होते आणि त्याचा फायदाही इंडिया आघाडीला तेव्हा झाला होता. फेक नरेटीव हा शब्द सर्वसामान्य मतदारांना पहिल्यांदा माहीत झाला होता. भारतीय संविधानाविषयी विरोधकांना काही देणे घेणे नाही. त्यांना लाल संविधान अर्थात माओवाद अभिप्रेत आहे. हे फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले असल्यामुळे इथून पुढे भाजपच्या सर्वच नेत्यांच्या तोंडी लाल संविधान हा शब्द येणार आहे. (opposition) सर्व प्रकारच्या माध्यमांचा विशेषतः समाज माध्यमांचा अतिशय प्रभावीपणे वापर करण्यात भाजपची मक्तेदारी होती. आणि ती निर्विवाद होती. भाजपच्या तुलनेत इतर सर्व राजकीय पक्ष याबाबतीत मागे होते. तथापि गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसने त्यात आघाडी घेतली आहे.

भाजप विरोधी वातावरण तयार करण्यासाठी काँग्रेसने फेसबुक पेक्षाही जास्त इंस्टाग्राम चा वापर केला आहे. या माध्यमावर 40% वाचक आहे. आणि इथे भाजपचा मीडिया सेल काहीसा मागे आहे. झालेली ही चूक सुधारण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. आपण राबवत असलेल्या अजेंड्याकडे विरोधी पक्षांचे लक्ष जाऊ नये यासाठी सर्वच विरोधी नेत्यांना भाजपने सर्व प्रकारच्या मीडियावर गुंतवून ठेवले होते. पण आता सर्व प्रकारच्या माध्यमांचा प्रभावी वापर केल्याशिवाय राजकारण करता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही ठिकाणी प्रभावी अभियान चालवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

जाहीरनामा, राजकीय वैचारिक व्यवहार या पातळीवर विरोधक उतरत होते. आता जंतर-मंतर-मंतर विरोधक हे कोणताही एक विषय हाती घेऊन त्याचा मुद्दा करतील . त्यावर रान उठवतील. या भीतीने भाजप आता वेगळी रणनीती घेऊन राजकारण करेल. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लोकसभेचे रणांगण येणार आहे. (opposition) त्यासाठी देशात आयोध्या चे राम मंदिर आणि राज्यात नाशिक येथील कुंभमेळा हे दोन विषय विरोधकांच्याकडून हाताळले जाणार आहेत. याची धास्ती भाजपने घेतली आहे. त्याला सामोरे कसे जायचे याचे चिंतन भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आले आहे.

काक्रोच जनता पार्टीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस”काँग्रेस जिताऊ प्रोग्रॅम”राबवत आहे. असे फडणवीस म्हणतात आणि त्याचवेळी काँग्रेसचा छुपा अजेंडा लाल संविधान असल्याचेही ते आवर्जून सांगतात, त्यामुळे इंडिया आघाडीने संविधान धोक्यात आहे, असा प्रचार सुरू केला की त्याला त्यांना लाल संविधान अभिप्रेत आहे असे उत्तर द्यायचे अशा प्रकारची रणनीती कार्यकारणीच्या बैठकीत आखण्यात आलेली आहे. सोशल मीडियाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रभावीपणे वापर केला जाणार असल्याचे संकेत या बैठकीतून दिले गेले आहेत.

हेही वाचा :

ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण?

राज्य मंत्रिमंडळात 4 सर्वात मोठे निर्णय, शेतकऱ्यांनाही मोठी खुशखबर मिळाली?

ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर?