देशात साखरेच्या दरात झपाट्याने वाढ होत असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने साठेबाजी आणि सट्टेबाजीविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाऊ नये, यासाठी सरकारने साठा मर्यादेत थेट निम्म्याने कपात केली आहे.

दिवाळीसह सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना साखरेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (sugar prices) त्याचवेळी बाजारात साखरेचे दरही वाढताना दिसत आहेत. साखरेसोबत खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्येही वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दूधाच्या दरवाढीमुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना साखरेच्या वाढत्या किमतीचीही चिंता सतावत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने साखरेच्या साठ्याबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त २ हजार क्विंटल साखरेचा साठा ठेवता येणार आहे. (sugar prices) यापूर्वी व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा ४ हजार क्विंटल होती. म्हणजेच सरकारने साठा मर्यादा थेट ५० टक्क्यांनी कमी केली आहे.
साखरेच्या बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून दर वाढवण्याचा प्रयत्न होऊ नये, हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढते. अशा वेळी काही व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठा करून बाजारात उपलब्धता कमी केली गेल्यास किमती आणखी वाढू शकतात. त्यामुळे सरकारने आधीच खबरदारी घेत व्यापाऱ्यांच्या साठ्यावर मर्यादा आणली आहे.
साखरेच्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली असतानाच सरकारच्या या निर्णयाकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. साठा मर्यादा कमी केल्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते आणि साठेबाजीला आळा बसण्याची शक्यता आहे. (sugar prices) त्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे बळ मिळू शकते.
दरम्यान, सरकारसमोर साखरेचे दर स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. मागणी वाढत असताना पुरवठा सुरळीत ठेवणे आणि व्यापाऱ्यांकडून साठेबाजी होऊ न देणे यासाठी प्रशासनाकडून बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जाण्याची शक्यता आहे. आता सरकारच्या या निर्णयाचा साखरेच्या बाजारभावावर नेमका किती परिणाम होतो आणि सर्वसामान्यांना त्याचा किती फायदा मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण?
राज्य मंत्रिमंडळात 4 सर्वात मोठे निर्णय, शेतकऱ्यांनाही मोठी खुशखबर मिळाली?
ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर?