गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारली. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित गणेशमूर्ती कार्यशाळेत हा उपक्रम पार पडला. (celebration) यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत सहभागी होत शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवली.

गणेशोत्सव जवळ आल्याने राज्यभरात गणेशमूर्तींच्या खरेदीपासून सजावटीपर्यंतची लगबग सुरू झाली आहे. (celebration) याच पार्श्वभूमीवर सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत शाडूच्या मातीचा बाप्पा साकारला.
या कार्यक्रमाला गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि योगेश कदम यांचीही उपस्थिती होती. पर्यावरणाचे नुकसान टाळत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींचे विसर्जन तुलनेने पर्यावरणपूरक असल्याने गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. (celebration) उत्सवाचा आनंद कायम ठेवत निसर्गाचे संरक्षण करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?
कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?