कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आणि अभिप्रेत नसलेली एखादी खळबळजनक घटना घडली तर ती पुन्हा घडू नये यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरताना उपाय योजना सुद्धा सांगितल्या पाहिजेत. कोणत्याच राजकीय पक्षांने त्याचे राजकीय भांडवल करू नये. राजकारण शिरल्यामुळे मूळ मुद्दा बाजूला जातो, पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रात सध्या हेच घडताना दिसत आहे.

स्पर्धा परीक्षा किंवा तत्सम परीक्षांचे पेपर फुटणे ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण लक्षावधी तरुण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेले हे प्रकरण असते. (expected) त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी काय उपाय योजना करता येतील यासाठी एकत्र येऊन विचार मंथन केले पाहिजे. सत्ताधारी मंडळींना कोंडीत पकडण्यासाठी एक चांगला मुद्दा सापडला अशा मानसिकतेत विरोधी पक्ष नेत्यांनी येता कामा नये. कारण आजचे विरोधक कालचे सत्ताधारी असतात आणि त्यांच्या काळातही पेपर फुटी सारखी प्रकरणे घडलेली असतात आणि आहेत. युवा पिढीच्या भवितव्याशी अशा प्रकारे कोणीही छेडछाड करू नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्यासाठी विरोधकांनी आग्रह धरला पाहिजे.
शिक्षण क्षेत्रासाठी आपले योगदान देणारे शिक्षणतज्ञ महाराष्ट्रात कमी नाहीत. त्यांची समिती गठित करण्यात यावी. शक्यतो या समितीवर विद्यमान किंवा निवृत्त कुलगुरूंची नियुक्ती करण्यात यावी. कारण त्यांना परीक्षेच्या संदर्भात दीर्घ अनुभव असतो.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने औषध निरीक्षक पदा साठी स्पर्धा परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. मात्र परीक्षा सुरू असतानाच पेपर फुटले. आणि मग परीक्षा स्थगित करावी लागली. स्पर्धा परीक्षेसाठी गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात राहून तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या परांडा तालुक्यातील विद्यार्थ्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. (expected) त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर बनले.ज्यांनी औषध निरीक्षक पदासाठीच्या परीक्षेचे पेपर लिक केले त्या संशयितांच्या विरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले हा सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सखोल तपासासाठी एस आय टी कडे सोपवले आहे.
वास्तविक पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, पण विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि तिथे विरोधी पक्षाचे नेते जाऊन या लढ्याचे नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विद्यार्थी संघटनांच्या व्यतिरिक्त राजकीय पक्षांनी त्यांना वाटत असेल तर स्वतंत्र आंदोलन उभे करावे.गेल्या पंचवीस वर्षात विविध परीक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार घडलेले आहेत. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आरोग्य विभागात भरती करण्यासाठी 2001 मध्ये परीक्षा घेतली होती पण या परीक्षेचे पेपर केव्हा फुटले होते. जिल्हा परिषद, शिक्षक आणि सरळ सेवा भरतीसाठी घेतल्या गेलेल्या परीक्षांमध्ये पेपर फुटण्याच्या घटना घडल्या होत्या. अमुक एका पक्षाचे सरकार सत्तेवर आहे म्हणून परीक्षांचे पेपर फुटतात असे म्हणता येणार नाही. इसवी सन 1999 ते इसवी सन 2026 यादरम्यान पेपर फुटी ची प्रकरणे घडलेली आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा, म्हाडा भरती परीक्षा, आरोग्य विभाग भरती परीक्षा, राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा, या सर्व परीक्षा घेताना सर्वच वेळी पेपर फुटले असे नाही. पण पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत.
स्पर्धा परीक्षा असो किंवा तत्सम परीक्षा असो त्याला सामोरे जाताना तरुणांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पुण्यामध्ये शैक्षणिक वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची तसेच मध्यमवर्गीयांची मुले आणि मुली परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे शहरात येत असतात. त्यासाठी त्यांना प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. प्रथमेश देशमुख मोठी स्वप्ने घेऊन पुण्यात आला होता पण पेपर फुटी मुळे डिप्रेशन मध्ये गेलेल्या प्रथमेशने आत्महत्या केली. परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज त्याच्या डोक्यावर होते. त्याचा मृत्यू हा सर्वांच्या मनाला चटका लावून गेला आहे. (expected) त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने पुढे आले पाहिजे कारण ते सरकारचे कर्तव्य आहे.
हेही वाचा :
माधुरी वनतारामधून निघाली शुक्रवारी पहाटेपर्यंत नांदणीत पोहचणार?
LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?
एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?