मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया?

मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीत 15 दिवस उपोषण केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन उपोषणाचा नारा दिला आहे. मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (reaction) परंतु ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुंबईत गणेशोत्सवात आंदोलन करने हे कायदा सुव्यवस्था दृष्टीने अवघड आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणर नाही, (reaction) याची काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे, राज्याची दृष्टीने हे अयोग्य आहे’.

‘आमची भूमिका ही एकच आहे. फडणवीस आणि शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. (reaction) मात्र या दोन्ही नेत्यांवर टीकाटीप्पणी केली जाते, हे महाराष्ट्राला पटत नाही. फडणवीस, शिंदे हे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करताय. गणेशोत्सव हा देशासहित राज्यातील सर्वांत माठा सण आहे, असेही बावनकुळे यांनी पुढे सांगितले.

हेही वाचा :

माधुरी वनतारामधून निघाली शुक्रवारी पहाटेपर्यंत नांदणीत पोहचणार?

LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?

एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?