मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया?

आज अखेर 20 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. (Devendra Fadnavis) त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त झाले आहेत. त्या शिवाय ते UPI पेमेंटवर शुल्क आकारलं जाणार त्यावरही बोलले आहेत.

आज अखेर 20 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त झाले आहेत. “मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांना आवाहन केलं होतं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या. एक मागणी कायदेशीर अडचण असल्यामुळे मान्य केली नाही, त्या बद्दल त्यांना सांगितलं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “सबकमिटीने त्यांना जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु. त्या आश्वासनांकरीता बैठक घेणं, ती पूर्ण करणं ते सगळं आम्ही करु. यात प्रशासकीय निर्णय आहेत. निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे. आमचे दरवाजे उघडे आहेत. मराठासमाजा करता जेवढे निर्णय आम्ही घेतले, तेवढे निर्णय कोणी केले नाहीत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“जे काही मिळालं ते आमच्या काळात मिळालं आहे. उपोषण संपलं याचा मला आनंद आहे. विखे पाटील, प्रसाद लाड, एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. या सगळ्यांनी खूप मदत केली. कुठल्या सणात विघ्न ने येता हे आंदोलन संपलं याचा आनंद आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.”माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढिदवस आहे. ते कधीच जन्मदिवस साजरा करत नाहीत. त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आम्ही विविध ठिकाणी सेवा करायची ठरवलं आहे. या सेवेच्या माध्यमातून एक महिना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी पंतप्रधान मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. (Devendra Fadnavis) त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची ज्या पद्धतीने आगेकूच सुरु आहे, विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करु. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून जनतेची सेवा विविध प्रकारे करणार आहोत. जनतेला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करु” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारलं जाणार आहे. हा छुपा कर असल्याचं म्हटलं जातय. मोदींनी पाठिचा कणा ताठ ठेवावा अशी टीका राहुल गांधी यांनी केली. “सर्वप्रथम राहुल गांधींना पाठिचा कणा आहे का, हे बघावं लागेल. याच कारण ते सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात संध्याकाळी एक बोलतात. जे लिहून दिलय ते वाचतात. त्यांना त्याची माहिती नसते” असं राहुल गांधींच्या टिकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. “यूपीआय संदर्भात केंद्र सरकारने अधिकृतपणे खुलासा केला आहे. वारंवार तो खुलासा करण्याची आवश्यकता नाही. हे टीका करणारे जे आहेत, जगातलं पेमेंट गेट वे भारताने तयार केलं. जग आज आपलं यूपीआय घेऊन चाललं आहे. (Devendra Fadnavis) आज अनेक देश आपलं यूपीआय वापरत आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे सबसिडी थेट खात्यात जमा होते. त्यामुळे भ्रष्टाचार संपला आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?