दुहेरी हत्याकांड सासरी घुसला आणि पत्नी आणि सासूवर चाकूने सपासप केले वार कारण काय?

उत्तर प्रदेशातील बलियात जावयाने सासरी घुसून पत्नी व सासूची चाकूने हत्या केली, तर सासरे गंभीर जखमी झाले. प्रेमविवाहानंतर वाढलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती असून आरोपी फरार आहे.

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयानेच आपल्या सासरच्या घरी घुसून आपल्या सासूची आणि बायकोची चाकूने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने सासऱ्यावर देखील वार केले. (house)यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बलिया जिल्ह्यातील बछईपूर नावाच्या एका गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र त्याने असं का केलं, हत्येमागचं कारण काय?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अमित गुप्ता असे आहे. त्याने चार वर्षांपूर्वी २०२२ मध्ये प्रीती नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र कालांतराने नात्यात दुरावा वाढत गेला. लग्नानंतरही दोघांमधील वाद मिटला नाही. प्रीती आणि आरोपी अमितला एक मुलगा आहे. वाद होत असल्याने प्रीती आपल्या माहेरी येऊन राहत होती. रात्री आरोपी अमित अचानक सासरी पोहोचला. तो थेट खोलीत शिरला आणि पत्नीकडून मुलाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. याला प्रितीने विरोध केला तेव्हा अमित संतापला. (house)त्याने थेट तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरडाओरडा ऐकून जेव्हा सासू आणि सासरे वाचवण्यासाठी आले, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात प्रीती आणि सासू सुशीला देवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सासरे अंतू गुप्ता गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. यात गंभीर जखमी झालेले सासरे यांच्यावर वाराणसी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. (house)लग्नानंतर अमित प्रीतीला आपल्या घरी न नेता दुसरीकडे घेऊन गेला होता आणि तिला मारहाण केली होती, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?