सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिना सरकारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई राहत (DR)वाढीबाबत सरकारकडून याच महिन्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. (employees) दरम्यान, पश्चिम बंगालमधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA वाढीचा निर्णय १ ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम बंगाल सरकारने जून महिन्यात राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA आणि DR मध्ये २० टक्के वाढ जाहीर केली होती. या निर्णयानंतर १ ऑक्टोबरपासून DA आणि DR हा सुधारित मूळ सॅलरी किंवा पेन्शनच्या ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. (employees) या वाढीचा लाभ राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सरकारी उपक्रम, पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार, कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारित बेसिक पगाराच्या ३८ टक्के दराने DA दिला जाईल. तर पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना सुधारित पेन्शनवर ३८ टक्के DR मिळेल. पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी DA १ ऑक्टोबरपासून १७१ टक्क्यांवरून २२३ टक्के करण्यात येणार आहे. (employees) तसेच काही दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या रोजच्या मजुरीमध्ये ११० रुपयांची वाढही १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही पुढील DA वाढीची प्रतीक्षा आहे. उपलब्ध अंदाजानुसार DA मध्ये ३ टक्के वाढ झाल्यावर तो ६३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा : 

दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?

विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा?