कोल्हापुरात वकिलास मारहाण करणाऱ्या दोन पोलिसांची तडकाफडकी बदली काय आहे नेमकं प्रकरण?

कोल्हापुरात ई-चलन वादातून वकील व त्याच्या मित्राला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. चौकशीनंतर संबंधित दोन पोलिसांची तातडीने बदली करण्यात आली आहे.

वाहनावर ई-चलन केल्याची विचारणा केल्याच्या रागातून वकिलासह मित्राला मारहाण करणाऱ्या दोघा पोलिसांची तडकाफडकी बदली करण्यातआली. सुरेश पाटील व रुपेश माने अशी त्यांची नावे आहे. दोघेही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत होते. मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांना सादर केला.

याबाबत अधिक माहिती अशी, ॲड. तौसिफ शेख आणि त्यांचा मित्र मतीन सय्यद यांना १४ एप्रिलला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अडवले. वाहनाची तपासणी करत मोटारीवर ई-चलन केले. (Kolhapur)कारवाई करणारे अंमलदार संतोष कुंभार यांच्याकडे ॲड. शेख यांनी कारवाईबद्दल विचारणा केली. हा वाद सुरू असताना बाजूला थांबलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने यांनी यात भाग घेतला. दोघांनी ॲड. शेख व मतीन सय्यद या दोघांना मारहाण करत पोलिस ठाण्यात नेले.

साध्या वेशात असलेल्या सुरेश पाटील व रुपेश माने यांनी थेट मारहाणच सुरू केल्याने दोघे गोंधळून गेले. जखमी मतीनला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. (Kolhapur)यानंतर ॲड. शेख यांनी तातडीने याबाबतची तक्रार पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे मेलवरून केली होती. या प्रकरणाची तक्रार त्यांनी जिल्हा बार असोसिएशनकडेही केल्याने सर्किट बेंचमध्ये याबाबतचा अर्ज दाखल झाला.

डिव्हीजन बेंचचे न्यायमूर्ती माधव जामदार व न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनीही या प्रकरणात तातडीने चौकशी करून २७ एप्रिलपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणाची चौकशी शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासणीत मारहाणीचा प्रकार समोर आला. (Kolhapur) तसेच पोलिस ठाण्यातील अंमलदारांचे जबाब नोंदवून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला. याची दखल घेऊन सुरेश पाटील व रुपेश माने यांची पोलिस नियंत्रण कक्षाकडे बदली झाली.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?