गेल्या 15 दिवसांत बँका आपल्या मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे चर्चेत आल्या आहेत. (holidays) त्यातच आता गुरुवारपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या महिन्यात तुमचे बँकेशी संबंधित काही काम असेल, तर त्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. कारण ऑक्टोबर 2026 मध्ये सण-उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे RBIच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार बँकांना एकूण 16 दिवस सुट्ट्या असतील.

16 दिवस बँका बंद मात्र, RBIच्या माहितीनुसार या 16 सुट्ट्या देशभरातील सर्व बँकांच्या शाखांना लागू होणार नाहीत. स्थानिक सण-उत्सव, जयंती आणि इतर कारणांमुळे राज्य किंवा शहरानुसार सुट्ट्यांमध्ये फरक असू शकतो. काही सुट्ट्या केवळ विशिष्ट राज्ये किंवा शहरांसाठी लागू आहेत. (holidays) त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी आपल्या शहरात संबंधित दिवशी बँक बंद आहे की नाही, हे तपासून घ्या.
कोणत्या दिवशी बँका बंद
02 ऑक्टोबर – शुक्रवार – महात्मा गांधी जयंती – देशभरात साप्ताहिक सुट्टी
04 ऑक्टोबर -रविवार – देशभरात साप्ताहिक सुट्टी
10 ऑक्टोबर – दूसरा शनिवार – देशभरात सुट्टी
11 ऑक्टोबर – रविवार – देशभरात साप्ताहिक सुट्टी
17 ऑक्टोबर – महासप्तमी – त्रिपुरा राज्यात सुट्टी
18 ऑक्टोबर – रविवार – देशभरात साप्ताहिक सुट्टी
19 ऑक्टोबर – सोमवार – दसरा – त्रिपुरा, तामिळनाडू, ओडिसा आदि राज्यांत सुट्टी
20 ऑक्टोबर – मंगळवार – दसरा – महाराष्ट्रासह मोठ्या प्रमाणात सर्व राज्यांत सुट्टी
21 ऑक्टोबर – बुधवार – विजयादशमी आणि दुर्गा पूजा – कर्नाटक, त्रिपुरा, आसाम , सिक्कीम
22 ऑक्टोबर – गुरुवार – दुर्गा पूजा – सिक्कीम
23 ऑक्टोबर – शुक्रवार – दुर्गा पूजा – सिक्कीम
24 ऑक्टोबर – चौथा शनिवार – देशभरात सुट्टी
25 ऑक्टोबर – रविवार – देशभरात साप्ताहिक सुट्टी
26 ऑक्टोबर – सोमवार – लक्ष्मी पूजा – त्रिपुरा, चंदीगढ
29 ऑक्टोबर – गुरुवार – करवाचौथ – शिमलामध्ये सुट्टी
31 ऑक्टोबर – शनिवार – सरदार वल्लभभाई पटेल जयंती – गुजरात राज्यात सुट्टी
महाराष्ट्रात बँका कधी बंद?
महाराष्ट्रात बँका 8 दिवस बंद राहणार आहे. यात –
02 ऑक्टोबर – शुक्रवार – महात्मा गांधी जयंती
04 ऑक्टोबर – रविवार
10 ऑक्टोबर – दूसरा शनिवार
11 ऑक्टोबर – रविवार
18 ऑक्टोबर – रविवार
20 ऑक्टोबर – मंगळवार – दसरा
24 ऑक्टोबर – चौथा शनिवार
25 ऑक्टोबर – रविवार
देशभरात बँक शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा मात्र सुरू राहतील. यात ग्राहक UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि ATMचा वापर करू शकतात. तसेच RBIच्या माहितीनुसार RTGS सेवा 24 तास आणि वर्षातील 365 दिवस उपलब्ध असते. (holidays) त्यामुळे शाखेत प्रत्यक्ष जाण्याची गरज नसलेल्या अनेक बँकिंग सेवा सुट्टीच्या दिवशीही करता येतात.
हेही वाचा :
२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?
UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?