गांधीनगरची महाविद्यालयीन तरुणी पेठवडगावमधील अपघातात ठार रस्ता ओलांडताना टेम्पोचे मागील चाक गेले डोक्यावरून…

पेठवडगाव येथील गणपती मंदिरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणी जागीच ठार झाली. दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना टेम्पोचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेले. (accident) गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महेक दीपक चावला (वय २३, रा. गांधीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महेक चावला ही पेठवडगाव येथील अशोकराव माने फार्मसी कॉलेजमध्ये एम.फार्म.चे शिक्षण घेत होती. गुरुवारी कॉलेज सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून (एमएच ०९ एफएस ६२६८) गांधीनगरच्या दिशेने निघाली होती. ती गणपती मंदिर परिसरात आली (accident) असताना रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात तिची दुचाकी टेम्पोच्या (एमएच ४२ टी ०९३३) मागील चाकाखाली आली. टेम्पोचे चाक थेट डोक्यावरून गेल्याने महेकचा जागीच प्राण गेला.

अपघाताची भीषणता पाहून गणपती मंदिर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (accident) या अपघातानंतर झालेल्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. महेकच्या वडिलांचे गडमुडशिंगी येथे मेडिकल दुकान असून, ती एकटी होती. या अपघाताची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून, तपास पोलिस निरीक्षक गोरख चौधरी करत आहेत.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार