सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजीही १ ऑक्टोबर लागू झालेले दरच कायम आहेत. (LPG cylinder) यावेळी १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

मुंबईत घरगुती सिलिंडर ९४१.५०, तर कमर्शियल सिलिंडर २,७६३.५० आहे. कोलकात्यात घरगुती सिलिंडर ९६८ आणि कमर्शियल सिलिंडर २,९४६.५० आहे. बंगळुरूमध्ये अनुक्रमे ९४४.५० आणि २,८९३.५०, तर चेन्नईमध्ये ९५७.५० आणि २,९७८.५० दर आहेत. दिल्लीमध्ये १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात ६२.५० ची वाढ झाली असून, आता तो २८१० रुपयांना मिळत आहे. सप्टेंबरमध्ये (LPG cylinder) याच सिलिंडरची किंमत २,७४७.५० होती. दुसरीकडे, दिल्लीतल्या १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९४२ इतकी आहे.
हैदराबादमध्ये घरगुती सिलिंडर ९९४ आणि कमर्शियल सिलेंडर ३,०५८.५० आहे. कटकमध्ये घरगुती सिलिंडर ९६८ आणि कमर्शियल २,९४७.५०, तर कोयंबतूरमध्ये अनुक्रमे ९५९ आणि ३,००२.५० दर आहे. रांचीमध्ये घरगुती सिलिंडरचा दर १,०१०.५०, तर कमर्शियल सिलिंडरचा दर २,९८८ आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला होतो आढावा तेल विपणन कंपन्या साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला LPGच्या दरांचा आढावा घेतात. (LPG cylinder) त्यानुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीला कमर्शियल सिलिंडर महाग करण्यात आला, तर घरगुती सिलिंडरचे दर तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सध्या जास्त भार पडलेला नाही. मात्र हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापरासाठी गॅस घेणाऱ्यांना वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती