कार- दुचाकीच्या धडकेत मुलीसह वडिलांचा मृत्यू; पाटण तालुक्यात भीषण अपघात, एक मुलगी गंभीर जखमी!

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आज दुपारी भीषण अपघात घडला असून कार आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत वडील आणि सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. (terrible accident) या दुर्घटनेत आणखी एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव येथील शेतकरी नितीन आत्माराम पाटील हे आपल्या दोन मुलींना घेऊन मोटारसायकलवरून उंब्रजकडे कामानिमित्त निघाले होते. चाफळ-उंब्रज मार्गावरील गावठाणाजवळ उंब्रजकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

या अपघातात नितीन पाटील यांची लहान मुलगी शिवन्या पाटील (वय ६) हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या नितीन पाटील यांना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेली आवनी नितीन पाटील (वय ११) हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर कारचालक वैभव निवास पाटील (रा. चाफळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा

अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?