राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबर पूर्वी साखर कारखाने सुरू करू नये, सरकारने तथा कृषी मूल्य आयोगाने ठरवलेली या एफ आर पी मान्य नाही, स्वामीनाथन आयोग व रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार व महसुली विभागणी सूत्रानुसार वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या दीडपटनुसार उसाला भाव मिळाला पाहिजे, असा ठराव येथे झालेल्या विविध शेतकरी संघटनाच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. माजी आमदार संपत बापू पवार म्हणाले ” वर्षानुवर्षे शेतकरी हा असंघटित राहिल्यामुळे शेतकऱ्याच्या घामाला दान मिळालेला नाही. सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम सर्व संघटनांनी एकजुटीने करावे.

येत्या काही दिवसात सर्व संघटनांचा व्यापक (meeting) मेळावा घेऊन शेतकरीत विरोधी धोरणांविरोधात रणशिंग फुंकावे लागेल. शेतकऱ्यांना न्याय वाटा न देता साखर कारखान्यांवरती कोट्यावधीची कर्जे कशी होतात याचा जाब विचारणार आहोत. जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने म्हणाले,” आम्ही सर्व शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादन खर्चाचा हिशोब मानला तर शेतकऱ्याला सात हजार च्या आसपास उसाला भाव मिळाला पाहिजे. यासाठी कायदेशीर लढाई देखील लढत आहोत. खत कंपन्या औषध कंपन्या शेतीची अवजारे ट्रॅक्टर यांचे दर वाढले आहेत महागाई वाढले आहे पण शेतकऱ्याला वर्षानुवर्षे जुनाच दर दिला जातो. व्यापक संघटनांच्या युतीमध्ये सहभागी होऊया.
जनता दलाचे वसंतराव पाटील म्हणाले,” शेतकरी शेतामध्ये एकटाच न राबता त्याचे कुटुंब राहते मात्र सरकार या श्रमाचे मूल्य व उत्पादन खर्च ग्राह्य न धरता आणि पद्धतीने उसाचा दर शेतकऱ्यांच्यावर लादते. आमदार खासदार हे विविध पक्षाचे असले तरी शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी मात्र एक होतात.पुढील आठवड्यात सर्व व्यापक शेतकरी संघटनांचा व्यापक मेळाव्याचे नियोजन करून त्यात अपेक्षित ऊसदर जाहीर करणे, ८ ऑक्टोबर रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे येथील आंदोलनास पाठिंबा आदी निर्णयही यावेळी घेण्यात आला. गिरीश फोंडे म्हणाले,” एकीकडे दुष्काळ सुरू असताना सरकार संकटात संधी शोधत आहे. साखर कारखान्यांच्या वर शेतकऱ्यांची मालकी आहे.
साखर कारखान्यातून मुख्य साखरेचे उत्पादन व उपउत्पादने या सर्वांमध्ये शेतकऱ्याला समान न्यायपूर्ण हिस्सा मिळाला पाहिजे. सरकार व साखर सम्राट यांची युती शेतकऱ्याला लुबाडत आहे, (meeting) त्यामुळे त्यांच्या युती विरोधात शेतकऱ्यांची शेतकरी संघटनांसोबत व्यापक युती करून लढा देणे गरजेचे आहे”शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव पाटील म्हणाले,” वर्षांवरचे शेतकरी असंघटित राहिला आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत.
सरकारने शेती व शेतकऱ्यांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. उसाला दर न देता शेतकऱ्याने कंटाळून जमीन विकली पाहिजे (meeting) अशी व्यवस्था कार्यरत आहे. त्या विरुद्ध एकत्र लढू. यावेळी बाबासाहेब देवकर, विक्रांत पाटील, नामदेव पाटील, दत्ता मेटिल,शिवाजी कांबळे, बाबुराव पाटील, कृष्णा पाटील भगवान पाटील यांची देखील भाषणे झाली. बाबुराव कदम वाय.एन.पाटील, दिनकर पाटील, कुमार जाधव, मधुकर पाटील, कृष्णात साबळे,संग्राम गायकवाड, सर्जेराव पाटील यांच्यासहित शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा :
राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा
MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू