दाऊद इब्राहिम याला भारत सरकारचा मोठा दणका, थेट मोठी कारवाई, विदेशातून…

भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार मानला जाणारा सलीम डोला याला भारतात आणण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेनंतर त्याला इस्तंबूलहून विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (great success) त्यानंतर त्याची गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सलीम डोला हा दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीशी संबंधित महत्त्वाचा सदस्य मानला जातो. मुंबईतील गुन्हेगारी जगत तसेच अमली पदार्थांच्या तस्करीत त्याची मोठी भूमिका असल्याचे सांगितले जाते. भारतीय यंत्रणा अनेक वर्षांपासून त्याच्या शोधात होत्या. अखेर त्याला ताब्यात घेऊन भारतात आणण्यात यश आल्याने हा मोठा धक्का दाऊद नेटवर्कला बसल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी पूर्ण झाल्यानंतर सलीम डोला याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. त्याच्याकडून डी-कंपनीचे सध्याचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार, आंतरराष्ट्रीय संपर्क आणि अमली पदार्थांच्या रॅकेटबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते.

सलीम डोलाची सुरुवात छोटा शकीलच्या जवळच्या सहकाऱ्याप्रमाणे झाली होती. मुंबई आणि परिसरात अमली पदार्थ पुरवठ्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील देशाबाहेर पळून गेले, मात्र डोला भारतात राहून डी-कंपनीचे नेटवर्क सांभाळत असल्याचे सांगितले जाते. नंतर तोही भारतातून फरार झाला होता. मात्र आता त्याला भारतात आणण्यात यश मिळाल्याने तपास यंत्रणांना मोठा धागा मिळाला आहे. सलीम डोलाच्या चौकशीतून दाऊद इब्राहिमच्या हालचालींबाबत आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?