मोदी सरकार कोसळणार CJP आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांचा मोठा बॉम्ब, तो दावा काय

सीजेपी आंदोलनचा वणवा पेटण्यापूर्वीच धरपकड सुरू नेत्यांची धरपकड सुरू झाली आहे. (leaders) त्याचवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खळबळजनक दावा केला आहे. दिल्लीत काय घडामोडी सुरू आहे

“सरकार कोसळणार, हे खात्रीने सांगतो”, असा मोठा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. SIR प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. तर त्याचवेळी आज सीजेपीचे जंतरमंतरवर आंदोलन होणार आहे. (leaders) त्याचवेळी राहुल गांधी यांचा हा दावा करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

दिल्लीत आज जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन होणार आहे. त्याचवेळी काँग्रेसनेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार पुकारला आहे. आपल्याला भारतीय नागरिकांचा पूर्ण पाठिंबा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सरकार कोसळणार हे खात्रीने सांगतो, असा दावाही त्यांनी केला. समजून घ्या. अंमलबजावणीकर्ते, आपल्याला सेवा देणारे हे काही राजे नाहीत. भारतीय नागरिकांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांना काय वाटतं, ते कोण आहेत? हाच लोकांचा आवाज आहे. तुम्ही या देशाचा आवाज आहात. ते कोण आहेत तुम्हाला सांगणारे की ते तुम्हाला भेटणार नाहीत? असा जबरी टोलाही त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लगावला.

या आठवड्यात इंडिया आघाडी आणि काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधा मोर्चा उघडला. पहिल्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे खासदारांनी मोर्चा वळवला. पण पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आकाशवाणी भवनात आंदोलन छेडण्यात आले. संध्याकाळपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. (leaders) त्यानंतर दुसऱ्या दिवशी निदर्शनं करण्यात आली. तिसऱ्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांनी राजघाट येथे शांततापूर्ण सत्याग्रह आणि आंदोलन केले. तर काल लंच डिप्लोमसीनंतर आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी सदस्यांनी ग्यानू तो गियो अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

राहुल गांधी यांच्या आंदोलनाला समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासह 19 पक्षांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर इतर दिवशी काही पक्षाचे खासदार दिसले नाही. काँग्रेसचे जे खासदार या आंदोलनाला उपस्थित नव्हते त्यांचे कान पिळण्यात आले. त्यानंतर अनेक खासदार आंदोलनात सहभागी झाले. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपवरही टीकास्त्र डागले आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू, 8 ते 11 ऑक्टोबर दुष्काळाचा आढावा

‘गोकुळ’साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान मतमोजणी कोल्हापुरात!

सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची सुनावणी कधी संपणार फैसला कधी