मोठी बातमी समोर येत आहे. उद्योग मंत्रालयातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी आता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. उद्योग मंत्रालयातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी आता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळासारख्या संकटाशी झुंज देत आहे. मात्र दुसरीकडे उद्योग मंत्र्यांच्या विभागातील अधिकारी लंडन दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यासाठी पाच कोटीहून अधिक खर्च आला आहे. (Aditya Thackeray) करदात्यांच्या पैशांमधून ही सहल आहे, असा जोरदार हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनंतर आता आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
उद्योग मंत्रालयातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत, (Aditya Thackeray) यावरून आदित्य ठाकरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळा सारख्या संकटाशी झुंद देत आआहे. तर दुसरीकडे उद्योगमंत्र्यांच्या विभागातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत. या लंडन दौऱ्यासाठी पाच कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला अशी माहिती समोर येत आहे. हे सगळे पैसे करदात्यांचे आहेत. करदात्यांचे कोट्यवधी रुपये या दौऱ्यावर खर्च झाले आहेत. उद्योग मंत्र्यांनी ऐनवेळी या शिष्टमंडळासोबत लंडनला जाणं टाळलं, मात्र तरी उर्वरित गटाला तिथे जाण्याची काय गरज होती? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
याच ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, दुष्काळाचा फटका उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे. अशा स्थितीमध्ये करदात्यांच्या पैशांवर लंडन सहलीचा आनंद घेण्याऐवजी या अधिकाऱ्यांनी ‘सुपर एल निनो’च्या काळात, वीज आणि पाणी यांचं व्यवस्थापन करण्यासाठी विविध जिल्ह्यांचे दौरे करण्याची गरज नव्हती का? असा सवाल (Aditya Thackeray) यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. दरम्यान आता आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना उदय सामंत नेमकं काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
‘गोकुळ’साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान मतमोजणी कोल्हापुरात!
सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची सुनावणी कधी संपणार फैसला कधी