प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लील व्हिडीओ बनवून अत्याचार १५ तरुणींचं लैंगिक शोषण, लव्ह जिहादचा संशय

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून तरुणींना जाळ्यात ओढणे, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणे आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात हातकणंगले पोलिसांनी शाहीद समीर सनदे (रा. पुलाची शिरोली) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तपासादरम्यान आणखी एका संशयिताचा सहभाग समोर येत असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित व्यक्ती शासकीय कर्मचारी असल्याचे सांगितले जात असून त्याच्याकडेही काही महिलांचे अश्लील व्हिडिओ असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून चौकशी आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे मामाचे गाव हातकणंगले तालुक्यात असल्याने त्याचे तेथे वारंवार येणे-जाणे होते. याच काळात त्याने एका महाविद्यालयीन तरुणीशी ओळख वाढवून प्रेमसंबंधाचे आमिष दाखवले. (love) त्यानंतर विविध कारणांनी तिचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. या माध्यमातून अनेक महिलांचे शोषण झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

या प्रकरणामुळे शिरोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना आणि बजरंग दलाने या घटनेविरोधात आवाज उठवला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. (love) याच पार्श्वभूमीवर मंगळवारी शिरोली गाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे नागरिक जमून निषेध फेरी काढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. करवीर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी बैठकीच्या ठिकाणी भेट देत कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. (love) तसेच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देत आरोपींविरुद्ध कठोर आणि जलद कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा

अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं