ऊसाला ५५०० दराची राजू शेट्टी यांची मागणी १३ ऑक्टोंबर पासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश,कर्नाटकात आंदोलने

यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी उसाला प्रति टन ५५०० साडेपाच हजार रुपये दर मिळण्यासाठी लढा देण्यात येईल, (Raju Shetty) अशी घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी रात्री केली. मात्र ही रक्कम शेतकऱ्यांना मिळताना हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि अखेरच्या टप्प्यात असे दोन टप्पे त्यांनी केले आहेत. हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या महिन्यात पहिला हप्ता साडेचार हजार रुपये नंतर ५०० रुपये असे ५ हजार आणि केंद्र सरकारकडून ५०० रुपये अनुदान असा एकूण साडेपाच हजार रुपये प्रति टन दर मागितला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रोप्य महोत्सवी ऊस परिषद जयसिंगपूर येथे शनिवारी रात्री पार पडली. (Raju Shetty) यावेळी मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी आंदोलनाची भूमिकाही जाहीर केली.दरम्यान, हा दर देण्यासाठी साखर कारखानदार आणि केंद्र सरकारकडून आडकाठी झाल्यास १३ ऑक्टोंबर पासून ऊसदरासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या ऊस उत्पादन करणाऱ्या तीन प्रमुख राज्यात राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.

त्यांनी सांगितले की, १५ नोव्हेंबर पर्यंत उसाची तोड घ्यायची नाही. इथेनॉलला लिटरला ७० रुपये भाव, कारखान्यातून बाहेर पडणार्‍या साखरेला किमान ५० रुपये हमी भाव केंद्र सरकारने दिला पाहिजे. ऊस दरासाठी १२ ऑक्टोबरची केंद्र सरकार बरोबर होणारी चर्चा फिसकटली तर १३ ऑक्टोबरला कर्नाटक राज्यात राष्ट्रीय महामार्ग बंद करणार आहे. महाराष्ट्रातही महामार्ग, रेल्वे बंद करणार आहोत. कोगनोळी टोल नाक्यावर बसणार कर्नाटक महाराष्ट्रातील राष्ट्रीय मार्ग बंद करणार आहोत. (Raju Shetty) त्यामध्ये मी स्वतः सहभागी होणार आहे. आंदोलनासाठी येताना जेवण घेऊन येण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी उत्तर प्रदेश मध्ये ऊस दरासाठी लढा देणारे एम. एस. सिंग, कर्नाटकातील ऊस उत्पादक नेते चन्नाप्पा, राजेंद्र गड्यानावर आदींची भाषणे झाली.

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा