ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा नको राहुल गांधींचं धक्कादायक विधान काय 

राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर पुन्हा जोरदार हल्ला चढवला आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा न घेतल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘आम्हाला तेच हवंय, सरकार मोठी चूक करत आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. दिल्लीत आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहून, ‘हे सरकारची चूक आहे, आम्हाला हेच हवंय’, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्ही आंदोलन करत आहोत. (resignation) सरकारने रस्त्यारस्त्यावर हजारो पोलीस तैनात केले आहेत. दिल्लीला एखाद्या किल्ल्यासारखं स्वरुप आलं आहे. असं करून सरकार मोठी चूक करत आहे. आम्हाला हेच हवं आहे. मोदी आणि त्यांचे लोक ज्ञानेश कुमार यांना अभय देत आहेत. आम्ही राजीनामा मागत आहोत, तरी ते राजीनामा घेत नाहीत. त्यांना अभय देत आहेत. आम्हाला तेच हवं आहे, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

ज्ञानेश कुमार आणि व्होट चोरीवरून गेल्या चार पाच दिवसापासून दिल्लीत पब्लिक आंदोलन सुरू आहे. देशाची राजधानी दिल्ली जेल का बनली आहे? ट्रेन, बसेस रोखण्यात येत आहेत. दिल्लीचा किल्ला बनवला आहे. सर्वत्र 20 ते 30 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (resignation) आम्हाला वाटतं 20 ते 30 हजार पोलीस रस्त्यावर यावेत. हे आम्हाला वाटतं. आणि हे सरकार हीच मोठी चूक करत आहे. आम्हाला देशाला दाखवायचं आहे की सरकार आणि नरेंद्र मोदी हे ज्ञानेश कुमार यांना अभय देत आहेत. आम्ही राजीनामा मागत आहेत, पण आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं. ते जेवढं प्रोटेक्ट करतील तेवढं आम्ही त्यांच्या कंट्रोलरकडे जाऊ, असं राहुल गांधी म्हणाले.

आम्हाला सगळीकडून माहिती मिळत आहे. ज्ञानेश कुमार यांची काय हालत आहे हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. घाबरू नका. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लाखो लोक रस्त्यावर आहेत. तुमच्या स्वभावाबाबत ते विचारत आहेत. तुमच्यासमोरही काही लोक आहेत. त्यांना हटवण्यासाठी आम्हाला तुम्हाला हटवायचं आहे. त्यामुळेच आमचं आंदोलन सुरू आहे, असं राहुल गांधी म्हणाले.यावेळी त्यांनी पोलीसही डिस्टर्ब असल्याचं सांगितलं. पोलीस डिस्टर्ब आहेत. आम्हाला तरुणांना का मारायला सांगत आहात? असा सवाल पोलीस करत आहेत. संघाच्या लोकांना मुक्त फिरवण्यास मुभा देण्यास सांगितलं जात आहे. पोलीस, सीआरपीएफ, आयटीबीटीत हा सवाल केला जात आहे. भाजपचे गुंड महिलांना मारत आहेत. तरुणांना मारा, पॅलेट गन चालवा म्हणून सांगत आहेत.

दुसरीकडे संघाचे तरुण आणि गुन्हेगारांना सोडा आणि या लोकांच्या माध्यमातून तरुणांना मारहाण करा, असं पोलिसांना सांगितलं जात आहे. यामुळे आम्हाला फायदा होत आहे. मी तुम्हाला आनंदाने सांगतो, 50 टक्के पोलीसवाले सांगत आहेत, तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. तुम्ही करत राहा, असं ते म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला. (resignation) त्यामुळे आम्ही आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असं सांगतानाच केंद्र सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात असून आम्हाला सर्व माहिती देत आहेत, असा दावाही त्यांनी केला

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा