ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. विविध कॅरेटमधील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. काल दिल्लीत सोने 1400 रुपयांनी उतरले होते. आज सकाळच्या ताज्या अपडेटनुसार,(Gold and silver) त्यात पुन्हा मोठी घसरण झाली. काय आहेत आता किंमती

रुपयाचे कमबॅक आणि जागतिक बाजारात मंदीच्या संकेतामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोने घसरले. अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, दिल्ली बाजारात काल सोने 1400 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर आज त्यात पुन्हा 1300 रुपयांची घसरण झाली. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव आता 1 लाख 53 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरला आहे. शुक्रवारी हा दर 1,54,400 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.चांदीत दोन हजारांची घसरण होऊन किंमत 2 लाख 26 हजार 500 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. goodreturns या संकेतस्थळानुसार, मुंबईसह पुण्यात एक ग्रॅम सोन्याचा भाव आज 14,967 रुपये इतका आहे. तर चांदीतही मोठी घसरण झाली आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून (IBJA) सोने आणि चांदीचा भाव जाहीर झाला आहे. (Gold and silver) त्यानुसार, 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव 14,806 रुपये, 23 कॅरेट एक ग्रॅम सोने 14,747, 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम सोने 13,562 रुपयांवर आहे. 18 कॅरेट एक ग्रॅम सोने आता 11,105 रुपये, 14 कॅरेट एक ग्रॅम सोने 8,662 रुपये असा भाव आहे. एक किलो चांदीचा भाव काल 2,20,874 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
PTI च्या वृत्तानुसार, HDFC सिक्योरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, जागतिक बाजारात मंदीचे संकेत दिसत आहेत. सोमवारी स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसली. जागतिक बाजारात रुपया मजबूत स्थितीत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीवर दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपया वधारण्यासाठी उपाय योजना केली होती. सोमवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 96 पैशांनी वधारला. तो 95.75 प्रति डॉलरवर बंद झाला.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. (Gold and silver) त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
हेही वाचा :
अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर
शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही