सांगली उपसा सिंचन योजनांद्वारे वितरित होणाऱ्या जत तालुक्यातील मध्यम प्रकल्प व लघुपाटबंधारे तलावावर उपसाबंदी लागू असतानादेखील पाण्याची अनधिकृत उचल किंवा पाणीचोरी (steal water) करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले.

दुष्काळी उपाययोजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी ड़ॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, आदिंसह पशुसंवर्धन, महावितरण, भूजल सर्वेक्षण, लघुपाटबंधारे, मृदसंधारण, पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे, नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे. (steal water) त्यामुळे टंचाई कृती आराखडे तयार ठेवावेत. मागणीप्रमाणे तातडीने टँकर्स पुरवठा करावा. चारा टंचाई टाळण्यासाठी शासकीय गायरान जमिनीवर चारा लागवड करण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कालपर्यंत खातेदारांच्या संख्येनुसार ७९.०१ टक्के, तर क्षेत्रफळानुसार ७९.४३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पीक पंचनामे तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करावेत. ई पीक पाहणीची कार्यवाहीही गतीने करावी. दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण) अंतर्गत संबंधित सर्व विभागांनी नियोजन करावे. कामे सेल्फवर मंजूर करून ठेवावीत. (steal water) त्यामुळे स्थानिक स्तरावर मागणीप्रमाणे कामे उपलब्ध करून देता येतील, असे ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब आहे. त्यामुळे, सिंचन योजनांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवावे आणि पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींवर तातडीने कार्यवाही करावी. उपसा सिंचन योजनांद्वारे वितरित होणाऱ्या पाण्याची अनधिकृत उचल किंवा पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी
पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ