पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला आहे. भाजप आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. एकनाथ शिदेंची शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. ज्यामुळे हा भाजपाला मोठा धक्का म्हणावा लागेल.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये वेगळी भूमिका दिसत आहे. या जागेसाठी एकनाथ शिंदे पहिल्या दिवसापासूनच आग्रही होते. मात्र, भाजपाही मागे हटण्यास तयार नव्हती. चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यावर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. एकनाथ शिंदे (Shiv Sena) यादरम्यान दिल्ली दाैऱ्यावरही गेले होते. मात्र, शेवटच्या क्षणी मोठी खेळी करण्यात आली. शिंदे सेनेकडून मंगेश चिवटे यांनी एबी फॉर्मही देण्यात आला होता. पण नंतर मंगेश चिवटे यांनी माघार घेतली. आता पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देत आहे. काल याबाबत उशीरा नंदनवनमध्य घडामोडी घडताना दिसल्या. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली. हेच नाही तर एकनाथ शिंदे नाराज असल्याचाही जोरदार चर्चा रंगताना दिसली.
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला आहे. भाजप आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. एकनाथ शिदेंची शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. भाजप आणि इतर मित्र पक्ष कौस्तुभ गावडेंना पाठिंबा देणार आहेत. हा भाजपाला मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. चिवटेंना शिवसेना शिंदे गटाने अर्ज मागे घ्यायला लावला पण काही फायदा झाला नाही.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा रंगताना दिसत होत्या. (Shiv Sena) त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडेही पाठ फिरवली. त्यातच रात्री शिवसेना शिंदे गटाचे महत्वाच्या नेत्यांची नंदनवन येथे बैठक झाली. शिंदे गट लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
सचिन सानप हे उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनी एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर त्यांनी माघार घेतली. (Shiv Sena) त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने थेटपणे सचिन सानप यांना पाठिंबा दिला. आता या लढतीकडे राज्याच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी
पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ