महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे हप्ते मिळण्यास विलंब होत असल्याचं दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर महिला आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. (women) अशातच दिवाळी जवळ आल्याने दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का, अशी चर्चा लाभार्थी महिलांमध्ये सुरू आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात. या आर्थिक मदतीमुळे महिलांना घरखर्च आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हातभार लागतो. मात्र, सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांचं लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पैसे नेमके कधी मिळणार, (women) याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्यास पात्र महिलांच्या खात्यात एकूण ३,००० रुपये येऊ शकतात. दिवाळीच्या खरेदीसाठी आणि घरातील इतर गरजा भागवण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो. (women) त्यामुळे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची अपेक्षा महिला व्यक्त करत आहेत. मात्र, दोन्ही हप्ते एकत्र देण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.ई-केवायसी आणि पात्रतेच्या पडताळणीदरम्यान काही महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे संबंधित महिलांनी आपली पात्रता आणि बँक खात्याची स्थिती तपासून घ्यावी. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळणार का, तसेच पैसे खात्यात कधी जमा होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
हेही वाचा :
दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार
आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव
आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा