दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळ आणि कमी पावसाचा परिणाम शेती उत्पादनावर झाला असून, तांदूळ आणि डाळींच्या दरात वाढ झाल्याने घरगुती बजेट कोलमडले आहे. (production) सणासुदीच्या काळातच जीवनावश्यक वस्तू महागल्याने ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे सांगितले जात आहे. उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा केला जात असून, त्याचा परिणाम बाजारातील दरांवर झाला आहे. तांदळाच्या काही प्रकारांच्या दरात किलोमागे २५ ते ३० रुपयांनी वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. (production) गेल्या ४० वर्षांपासून तांदळाच्या व्यापारात असलेले व्यापारी सतीश सावजी यांच्या माहितीनुसार, उत्पादन घटल्यामुळे तांदळाचे भाव वाढले आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. पूर्वी एक-दोन कट्टे तांदूळ खरेदी करणारे ग्राहक आता केवळ १० किलो तांदूळ घेण्याला पसंती देत आहेत. वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तांदळाबरोबरच डाळींच्या दरातही किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, तेलाचे दर सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. तांदळाचे भाव पुढील पाच ते सहा महिने कमी होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापारी सतीश सावजी यांनी व्यक्त केला आहे. (production) दरम्यान, तांदळाच्या साठवणुकीवर २०० टनांची मर्यादा घालून दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, उत्पादनातील घट आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे बाजारावर दबाव कायम आहे. दिवाळीच्या काळातच तांदूळ आणि डाळी महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चाचे गणित बिघडले असून, आगामी काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कसे राहतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी जय पवार थेट सीआयडी कार्यालयात काय आहे प्रकरण
BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार
मनोज जरांगे दारू पितात का काय दिलं उत्तर म्हणाले, मी आत्महत्याच