येत्या वीकेंडला मित्र-परिवारासोबत कार्यक्रम आखणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरात २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार आहे. या कालावधीत राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार, पब आणि मद्यविक्रीचा परवाना असलेली आस्थापने दिवसभर बंद राहणार आहेत.

आषाढी एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. या दिवशी लाखो भाविक भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दरवर्षी या दिवशी मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येते. (Ashadhi Ekadashi) त्यानुसार यंदाही आषाढी एकादशी शनिवार (ता.२५) रोजी साजरी केली जाणार असून यावेळी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागरपूरसह अनेक जिल्ह्यांत ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे.
राज्यांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये राज्य उत्पादन शुल्क नियमांनुसार याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार असून तिथे मद्याची दुकाने, बार आणि परवानाधारक किरकोळ विक्री केंद्रांवर मद्याची विक्री व सेवा करण्यास मनाई असणार आहे. (Ashadhi Ekadashi) त्यामुळे ड्राय डे दरम्यान नागरिकांना कोणतेही नियोजन करताना याची माहिती ठेवावी आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी ही भगवान विष्णूच्या विठ्ठल स्वरूपाला समर्पित मानली जाते. हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी शुक्रवार, २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी सुरू झाली असून २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजू ३४ मिनिटांच्या सुमारास समाप्त होणार आहे. २५ जुलै रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्यामुळे या दिवशी आषाढी एकादशीचे व्रत आणि पूजा केली जाते. (Ashadhi Ekadashi) तसेच तुळशीची पूजा, विष्णू नामस्मरण आणि भक्तीपर कार्यक्रमांनाही या काळात विशेष महत्त्व असते.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?