मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयसिंगपूर शहरातील नोकर हौसिंग सोसायटी परिसरात बुधवारी दुपारी अपहरणाची धक्कादायक घटना घडली. काही जणांनी चारचाकी वाहनातून येत एका घराच्या गेटची तोडफोड केली. (shocking) त्यानंतर घरात असलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीला जबरदस्तीने बाहेर आणून लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून घेऊन जाण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी काही लोक चारचाकी वाहनातून नोकर हौसिंग सोसायटीतील एका घरासमोर आले. त्यांनी प्रथम घराच्या प्रवेशद्वाराच्या गेटची तोडफोड केली. त्यानंतर घरात प्रवेश करून एका व्यक्तीला जबरदस्तीने बाहेर आणले. (shocking) यावेळी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याला वाहनातून घेऊन जाण्यात आले. विशेष म्हणजे, घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊनही दुसऱ्या दिवशीपर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार काही घरगुती वादातून घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. संबंधित व्यक्तीला त्याच्याच नातेवाईकांनी चारचाकी वाहनातून नेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित वाहनाच्या मालकाशी संपर्क साधला असता, त्याने दोन महिन्यांपूर्वीच ही गाडी विकल्याचे सांगितले. (shocking) तसेच संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. हा कौटुंबिक वाद असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांत फिर्याद दिलेली नसली, तरी पोलीस स्वतःहून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा : 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं, पडळकरांच्या गटातील मतदाराच्या अपहरणाचा आरोप तिघांवर गुन्हा

कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान

गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर