बसमध्ये चढलेल्या वृद्ध दाम्पत्याला खाली उतरवलं; कंडक्टरचा उर्मटपणा VIDEO VIRAL

एसटी बसमध्ये गर्दी असल्याचं सांगत एका वृद्ध जोडप्याला पायऱ्यांवरूनच(Conductor’s) बस वाहकानं खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नंदूरबारच्या शिरपूर आगारातली ही घटना आहे. नंदुरबारमध्ये बसमध्ये जागा नसल्याचं सांगत बस कंडक्टरनं वृद्ध दाम्पत्याला खाली उतरवताना त्यांना अपमानास्पद वागणूकही दिली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की, वृद्ध दाम्पत्य सुरुवातीला ज्या बसमध्ये बसले ती बस अचानक खराब झाली. त्यामुळे शिरपूर आगाराच्या दुसऱ्या (Conductor’s)बसमध्ये ते चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी कंडक्टरनं त्यांना अडवलं. फक्त अडवून कंडक्टर थांबला नाही तर त्यांना उर्मट भाषेतही बोलला.

कंडक्टर म्हणते की, ओ आजी चला ना.. कसं समजत नाही तुम्हाला, गाडी खाली असती तर ठिक होतं. पण बघा ना किती लोड आहे. बस खाली असती तर वेगळी गोष्ट असती. व्हिडीओ करणाऱ्यालाही कंडक्टरने आत येऊन बघा असंही म्हटलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे.(Conductor’s)बसमध्ये जागा नसल्याचं सांगताना कंडक्टरनं वृद्ध दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक देत खाली उतरवलं. त्यावेळी तिथंच असलेल्या एका प्रवाशानं हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बस कंडक्टरवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

काही विवाह भयानक असतात… Video Viral