लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांसाठी दिलेली मुदत संपत आल्याने अनेकांच्या लाभावर गंडांतर आले आहे. (development) योजनेत सहभागी झालेल्या लाखो महिलांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यात येणारी आर्थिक मदत थांबवण्यात आली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असला तरी केवायसीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, तर अनेक ठिकाणी प्रक्रियेची अपुरी माहिती यामुळे महिलांकडून चुकीची माहिती भरली गेली. परिणामी त्यांचे अर्ज अपात्र ठरले आणि लाभ बंद झाला. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातच लाखोंच्या संख्येने अर्ज आले होते, त्यापैकी मोठ्या संख्येने महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही.
दरम्यान, केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवून ३० एप्रिलपर्यंत देण्यात आली होती आणि आजच त्या प्रक्रियेचा शेवटचा दिवस असल्याने प्रशासनानेही तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे लाभ एकदम बंद करणे शासनासाठीही आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळेच आता केवायसीसाठी आणखी एक अंतिम संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी न केलेल्या महिलांनाही पुन्हा एकदा संधी देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. जर हा निर्णय झाला, तर ज्यांचा लाभ बंद झाला आहे, त्या महिलांना पुन्हा योजना सुरू करून घेण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे.
तरीही, अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत महिलांनी कोणतीही जोखीम न घेता शक्य तितक्या लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. कारण अंतिम क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वेळेतच कारवाई करणे गरजेचे ठरणार आहे.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर