इस्रायल निवडणुकीत नेतन्याहूंच्या नेतृत्वाखालील सरकारचा खेळ खल्लास होण्याची चिन्हे आहेत. अरब पक्ष किंगमेकर ठरले असून, त्यांनी विरोधी पक्षाचे नेते गादी आयजेनकोट यांना पाठिंबा दिला आहे. (kingmaker) त्यामुळे आयजेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. मात्र, आयजेनकोट यांच्या आघाडीतील एका पक्षाने अरब पक्षांसोबत सरकारमध्ये सामील होण्यास विरोध दर्शविल्याने पेच निर्माण झाला आहे.

इस्रायलची निवडणूक पार पडली असून देशात कुणाचं सरकार येणार याचं चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग हे रविवारी नव्या सरकारची घोषणा करणार आहेत. विरोधी पक्षाचे नेते गादी आयजेनकोट यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मोठ्या संख्येने शिफारशी आल्या आहेत. या निवडणुकीत अरब पक्ष किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी सुद्धा राष्ट्रपतींशी चर्चा करून आयजेनकोट यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. (kingmaker) त्यामुळे इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा खेळ खल्लास झाला असल्याचं बोललं जात आहे.
इस्रायली संसद नेसेटमध्ये 120 सदस्य आहेत. नेतन्याहू यांच्या आघाडीने 53 जागांवर विजय मिळवला आहे. तर आयजेनकोट यांच्या आघाडीने 48 जागा जिंकल्या आहेत. तर अरब पक्षांनी विक्रमी 19 जागा जिंकून संपूर्ण खेळ आपल्या हातात घेतला आहे. निवडणूक निकाल घोषित होताच अरब पक्षांनी आयजेनकोट यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे विरोधकांची साथ मिळाल्याने आयजेनकोट हे इस्रायलचे नवे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, रविवारीच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.
आयजेनकोट यांच्या आघाडीतील दक्षिणपंथी पार्टी इस्रायल बेइतेनूने विरोधाचा सूर आवळला आहे. अरब पक्षांच्या पाठिंब्यावर टिकलेल्या सरकारमध्ये आम्ही सामील होणार नाही, असं इ्स्रायल बेइतेनूने म्हटलं आहे. या पक्षाचे नेते अविगडोर लिबरमॅन यांनी याचं कारणही स्पष्ट केलं आहे. अरब पक्षांनी हमासला जाहीरपणे दहशतवादी संघटना म्हणायला नकार दिला आहे. (kingmaker) त्यामुळेच आम्ही अरब पक्षांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करणाऱ्या कोणत्याही सरकारमध्ये जाणार नाही, असं अविगडोर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आयजेनकोट यांच्यासमोरचं संकट अजून काही टळलेलं नाहीये.
दुसरीकडे नेतन्याहू यांचा अनेक वर्षापासूनचा सहकारी पक्ष यूनायटेड तोराह जुडैज्मने राष्ट्रपतींची भेट घेतली. पण नेतन्याहू यांना पंतप्रधान करण्याची शिफारस या मित्र पक्षाने केली नाही. मात्र, त्यांनी आयजेनकोट यांचंही समर्थन केलेलं नाही. असं असलं तरी मित्र पक्षाच्या मौनामुळे नेतन्याहू यांना मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे.
नेसेटमध्ये बहुमतासाठी 61 जागांची आवश्यकता आहे. नेतन्याहू आणि आयजेनकोट या दोघांनीही बहुमत मिळालेलं नाही. सर्व खेळ आता अरब पक्षांच्या हातात आहे. अरब पक्ष आयजेनकोट यांच्या पाठी आहेत. पण एक मित्र पक्ष मात्र अरब पक्षांच्या विरोधात असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी सर्वच राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेनंतरच रविवारी देशाचा नवा पंतप्रधान जाहीर होणार आहे. यावेळी आयजेनकोट यांना लॉटरी लागते की नेतन्याहू काही चमत्कार घडवतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले
निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा