महामार्गावरील आंदोलनात पोलिसांची संयमी भूमिका

ऊसदराच्या रास्त मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे येथे तब्बल ६२ तास ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन चालले. या काळात आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू न देता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात सातारा जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाला यश आले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या समन्वयपूर्ण नेतृत्वामुळे हे आंदोलन शांततेत पार पडले.

प्रशासनाने शेतकऱ्यांच्या संवेदनशील प्रश्नाची हाताळणी करताना आंदोलकांशी सातत्याने सुसंवाद ठेवला. महामार्गावर दोन्ही बाजूंना सुमारे ३० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी व मालवाहू वाहने अडकल्याने परिस्थिती बिकट झाली होती. (Shetkari) अशा वेळी जिल्हा व शहर वाहतूक शाखेने पुण्याकडून कराड, कोल्हापूर, सांगलीकडे जाणारी आणि विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक अंतर्गत ग्रामीण मार्गांवरून वळवली. रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी विशेष रस्ता खुला ठेवण्यात आला.

अचानक महामार्ग रोखला गेलेला असताना अन्न पाण्याविना हाल होत असल्याने संतप्त झालेल्या वाहनचालकांनी महामार्गावर आंदोलन केले. प्रशासनाविरोधात भूमिका घेतलेली.दिवाळीमुळे घरी जाण्याची गडबड असताना शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत नाही. आंदोलनाचा कालावधी लांबत आहे. (Shetkari) त्यामुळे वाहनचालकांचा संयम डळमळीत झालेला असतानाही पोलिसांची भूमिका ही अतिशय संयमी अशीच राहिली. महामार्गावर शेतकरी आणि वाहनचालकांचे गरमागरम वातावरण असतानाही जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या नियोजनासह वाहतूक शाखा, विविध पथकांचे मोलाचे योगदान राहिले.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे स्वतः या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आपल्या १४० ६२ तास सुरू असलेले आंदोलन शांततेत सहकारी कर्मचाऱ्यांसह महामार्गावर उतरले होते. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सातारा तालुका पोलीस निरीक्षक नीलेश तांबे, सातारा शहर पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस यांच्यासह त्यांच्या पथकांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून संयमाने परिस्थिती हाताळली. हजारो शेतकरी महामार्गावर ठाण मांडून असतानाही पोलिसांनी बळाचा वापर न करता संवादाला
प्राधान्य दिले.

अखेर ६ नोव्हेंबर रोजी ऊसदराचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (Shetkari) त्यानंतर आंदोलनस्थळावरील तंबू व बॅरिकेड्स हटवून पुढील पाच तासांच्या अथक नियोजनानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सन्मान राखत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि प्रवाशांची गैरसोय टाळणे, या सर्वच आघाड्यांवर सातारा पोलीस व जिल्हा प्रशासनाने दाखवलेला संयम आणि समन्वय कौतुकास्पद ठरला आहे.

हेही वाचा : 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय

सांगलीतील बैठकही निष्फळ