महायुतीत पुन्हा अंतर्गत वाद उफाळला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भाजपवर सरकारी कार्यक्रमांतून शिवसेनेला डावलल्याची तक्रार केली आहे. मनोज जरांगे पाटील ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर आणि विधानपरिषद पराभवानंतरही युतीतील खदखद कायम आहे. “युतीत राहून फायदा काय?” असा संतप्त सवाल शिंदे सेनेचे नेते विचारत आहेत, ज्यामुळे युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी एक कथित ऑडिओ क्लिप महाराष्ट्राला ऐकवली होती. त्यात भाजपचे काही लोक मनोज जरांगे पाटील यांना मॅनेज करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचं बोलताना दिसत आहेत. (Shiv Sena) त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ही क्लिप आल्यानंतर शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. हा वाद संपत नाही तोच विधान परिषद निवडणुकीत भाजपचा सडकून पराभव झाल्याने पुन्हा एकदा शिंदे सेना आणि भाजप आमनेसामने उभी ठाकली होती. हे दोन वाद थांबलेले असतानाच पुन्हा एकदा महायुतीत फाटल्याचं दिसत आहे. महायुतीत गळचेपी सुरू असल्याची तक्रारच शिंदे सेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. भाजप विरोधात ही तक्रार करण्यात आल्याने महायुतीत अजूनही काहीच अलबेल नसल्याचं चित्र आहे.
महायुतीत शिवसेनेची गळचेपी सुरूच असल्याची तक्रार पक्षातील नेत्यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Shiv Sena) गेल्या वर्षभरापासून शासकीय कार्यक्रमातून शिवसेनेच्या नेत्यांना भाजप डावलत आहे. हे अत्यंत चुकीचं असून त्यावर शिंदे सेनेच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. थेट एकनाथ शिंदे यांच्याकडेच ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आपल्या सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याची या नेत्यांची भावना आहे. संविधान बचाव पदयात्रा, नवी मुंबई एयरपोर्टवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर, कुलाब्यात घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम, वर्षावरील दुष्काळ बेठक यातून शिवसेना नेत्यांना डावललं जात असल्याने नेते नाराज आहेत. युतीत असूनही डावललं जात असेल तर मग युतीचा फायदा काय? अशी संतप्त भावनाच शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रशासकिय अधिकारी आपलं न ऐकता भाजपच्याच नेत्यांचंच ऐकतात. (Shiv Sena) त्यांना एवढा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवालही भाजपच्या नेत्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नेत्यांच्या या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. यावर योग्य तो तोडगा काढू. चिंता करू नका, असं आश्वासन शिंदे यांनी या नेत्यांना दिल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या 15 दिवसांपासून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आला आहे. त्यामुळे महायुतीत खदखद असल्याचं समोर आलं आहे. महायुतीतील ही खदखद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेते काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय