दुसऱ्या वनडेत विराट कोहली फ्लॉप, पण रचला इतिहास, रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड मोडला

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली फ्लॉप ठरला. अवघ्या 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली. विराट कोहली जास्तवेळ खेळपट्टीवर नव्हता. पण त्याने रेकॉर्ड केला. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे मध्ये शानदार अर्धशतक झळकवलं होतं. (Team India) दुसर्‍या वनडे मध्ये तो फ्लॉप ठरला. शनिवारी वेलिंगटनमध्ये सात चेंडूत त्याने 7 धावा केल्या. यात एक चौकार होता. कोहलीला वेगवान गोलंदाज जेकब डफीने चौथ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाद केलं. कोहलीने ऑफ स्टम्पच्या लाइनमध्ये आलेला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण कव्हरला विल यंगकडे त्याने सोपा झेल दिला. कोहली वेलिंगटन वनडे मध्ये मैदानावर जास्त वेळ पाय रोवून उभा राहू शकला नाही. पण तो इतिहास रचण्यात यशस्वी ठरला. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे.

38 वर्षीय कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध आतापर्यंत 38 वनडे सामन्यात 56.51 च्या सरासरीने 1978 धावा केल्या आहेत. (Team India) यात सात शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. वर्ष 2010 मध्ये कोहली न्यूझीलंड विरुद्ध तो पहिला वनडे सामना खेळलेला. कोहलीने रिकी पाँटिंगचा दमदार रेकॉर्ड मोडला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार राहिलेल्या रिकी पाँटिंगने न्यूझीलंड विरुद्ध 51 वनडे सामन्यात 45.83 च्या सरासरीने 1971 धावा केल्या होत्या. त्याने 6 सेंच्युरी आणि 12 अर्धशतकं झळकवलेली. कोहलीने वेलिंगटन वनडे मध्ये एक धाव घेताच त्याने पाँटिंगला मागे टाकलं. ऑकलंड वनडेमध्ये विराट कोहलीने 74 धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने 42 सामन्यात 46.05 च्या सरासरीने न्यूझीलंड विरुद्ध 1750 धावा केल्या आहेत.

वेलिंगटनमध्ये 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कॅप्टन शुबमन गिल गोल्ड डक म्हणजे पहिल्या चेंडूवर आऊट झाला. गिलला डफीने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हेनरी निकोलस करवी कॅचआऊट केलं. (Team India) त्यानंतर बॅटिंग आलेला कोहली आधी डॉट बॉल खेळला. मग पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पाँटिंगचा रेकॉर्ड मोडला. पहिल्या वनडेत रोहित शर्मा शून्यावर बाद झालेला. दुसऱ्या वेलिंगटन वनडेत रोहितने 28 चेंडूत दोन चौकार आणि षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. जॅमीसनच्या नवव्या ओव्हरमध्ये तो पॅवेलियनमध्ये परतला.

ODI मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा
विराट कोहली (भारत) 1978 धावा
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) 1971 धावा
सचिन तेंडुलकर (भारत) 1750 धावा
कुमार संगकारा (श्रीलंका) 1568 धावा
सनथ जयसूर्या (श्रीलंका) 1519 धावा
जॅक्स कॅलिस (साउथ अफ्रीका) 1449 धावा

हेही वाचा : 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय

सांगलीतील बैठकही निष्फळ