राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे.(join) प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संभाव्य निर्णयामुळे राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांची भूमिका (join) आणि त्यांचे सत्ताधारी गटाशी वाढते जवळीक यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. शिवसेनेत प्रवेश झाल्यास विदर्भासह इतर भागांमध्ये शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून दोन्ही बाजूंनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, बच्चू कडू यांचा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा(join) ठरू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर