मोठी बातमी दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता दूध दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. (milk price) कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळकडून दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर गोकुळने घेतलेल्या या निर्णयामुळे दूध उत्पादकांसह ग्राहकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, गोकुळच्या इतिहासातील म्हशीच्या दुधाच्या विक्री दरातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगितले जात आहे.

गोकुळकडून म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (milk price) त्यामुळे म्हशीचे दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता अधिकचा भार सहन करावा लागणार आहे. यापूर्वीच्या दरवाढीच्या तुलनेत ही वाढ मोठी असल्याने ग्राहकांच्या घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे गायीच्या दुधाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली असून, दूध उत्पादकांच्या खरेदी दरातही प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गायीचे दूध घेणाऱ्या ग्राहकांनाही आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

एकीकडे दूध उत्पादकांना वाढीव दराचा दिलासा मिळणार असला, (milk price) तरी दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा आणखी एक सामना करावा लागणार आहे. दूध हे प्रत्येक घरातील दैनंदिन गरजेचे उत्पादन असल्याने या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबांपासून हॉटेल व्यावसायिक आणि चहा विक्रेत्यांपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना