राजस्थानमधील पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर मोठे यश मिळवले आहे. महापालिकांमधील विजयानंतर ग्रामीण भागात भाजपला धक्का बसला. बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारत, भाजपच्या गडांमध्येही विजयाची नोंद केली. यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या काँग्रेसच्या मागणीला बळ मिळाले आहे.

राजस्थानात झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुकांमध्ये विजय मिळवणाऱ्या भाजपला ग्रामीण भागात मात्र मोठा झटका बसला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या तुलनेत प्रचंड चांगली कामगिरी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात भाजपच्या दिग्गज नेत्यांचा प्रभाव आहे, (Congress) त्या ठिकाणी भाजपला नामुष्कीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. बॅलेट पेपरवर निवडणुका होताच काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. या निकालामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत, ही काँग्रेसची मागणी योग्यच असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने 2,990 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपने 1,795 जगांवर विजय मिळवला आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने 143 जागा जिंकल्या असून भाजपच्या खात्यात केवळ 83 जागा आल्या आहेत.
या निवडणुकीत भाजपचा सहयोगी पक्ष हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला पंचायत समितीत 438 आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 4 जागा मिळाल्या आहेत. तसेच अपक्षांनी पंचायत समितीत 516 जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला 301 महापालिकांमध्ये 197 ठिकाणी विजय मिळाला होता. मात्र, ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपला पंचायतीच्या निवडणुकीत सपशेल नाकारल्याचं दिसून येत आहे. 2020-21 च्या पंचायत समितीच्या निवडणुकीपेक्षा यावेळी काँग्रेसची कामगिरी सरस झाली आहे. (Congress) त्यावेळी भाजपने ग्रामीण भागात दबदबा निर्माण केला होता. डिसेंबर 2020 मध्ये 21 जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला जिल्हा परिषदेत 636 जागांपैकी 353 जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला केवळ 252 जागा मिळाल्या होत्या. तर जिल्हा परिषदेत भाजपने 14-15 जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. तर काँग्रेसला केवळ पाच जिल्हा परिषदांवर सत्ता आणता आली होती.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांच्या गडांमध्ये काँग्रेसने सुरूंग लावला आहे. सीकरमध्ये नगरविकास मंत्री झाबर सिंह खर्रा यांची पत्नी आणि दोन्ही मुले या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या झोटवाडा विधानसभा मतदरासंघातही भाजपची कामगिरी सुमार झाली आहे. या ठिकाणच्या पंचायत समित्यांच्या 15 जागांपैकी एकाच जागेवर भाजपला विजय मिळाला आहे. या उलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी सीकरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सचिन पायलट यांच्याशी संबंधित टोंक परिसरातही काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे.
राजधानी जयपूरच्या ग्रामीण भागातही काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. जिल्ह्यातील 22 पंचायत समित्यांपैकी 14 पंचायत समित्यांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर काही भागात भाजप आणि आरएलपीनेही खातं खोललं आहे. चोमू आणि सांभरमध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. तर सांगानेरमध्ये आरएलपीने विजय मिळवला आहे. पाच पंचायत समित्यांमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. (Congress) त्यामुळे या ठिकाणी अपक्षांना घेऊन सत्ता स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. राजकीय घराणेशाहीलाही या निवडणुकीत बऱ्यापैकी झटका बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांचे चिरंजीव पराक्रम सिंह यांचा जिल्हा परिषदेत विजय झाला आहे. त्यांना 17,861 मते मिळाली आहे. त्यांची सून कनिका सिंह यांनीही 2,384 मतांनी विजय मिळवला आहे. तर झाबर सिंह खर्रा यांच्या कुटुंबीयांचा पराभव झाला आहे. तसेच भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचाही पराभव झाला आहे.
राजस्थानच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी दबदबा निर्माण केला आहे. अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे अपक्ष आणि इतर प्रादेशिक पक्षांना महत्त्व आलं आहे. पंचायत समितीत 516 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर RLP ने 438 आणि भारत आदिवासी पार्टी (BAP) ने 215 जागा जिंकल्या आहेत.
इतरांची विजयी कामगिरी :
भारत आदिवासी पार्टी (BAP) : 215 जागा
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) : 50 जागा
बहुजन समाज पार्टी (BSP) : 44 जागा
आम आदमी पार्टी (AAP) : 2 जागा
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पाच जागा मिळाल्या आहेत. आरएलपीला चार आणि सीपीएमला तीन तर बीएसपीला एका जागेवर विजय मिळाला आहे. अनेक ठिकाणी हे छोटे पक्ष निर्णायक भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे या पक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं