कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि छोट्या शहरांचे नगराध्यक्ष यांनाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना केल्या जात आहेत. यंदाचा दुष्काळ हा 1972 च्या दुष्काळापेक्षा भीषण असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. दुष्काळाशी सामना करण्यासाठी पुरेसा पैसा शासन तिजोरीत नाही आणि पैशाचे सोंग काढता येत नाही अशा कोंडीत सरकार आहे. जे इतिहासात डोकावून पाहत नाहीत (farmers) त्यांना कठीण वर्तमानाशी दोन हात करता येत नाहीत. राज्याच्या इतिहासात अनेकदा दुष्काळ पडलेला आहे पण त्याचा अभ्यास करून असे कठीण प्रसंग भविष्यात पुन्हा येऊ नयेत म्हणून ठोस उपाय योजना केल्या नाहीत, त्याचे गंभीर परिणाम सध्या महाराष्ट्र भोगतो आहे.

राजर्षी शाहू महाराज यांनी करवीर संस्थांनची सूत्रे हाती घेतली तेव्हा, सलग दोन वेळा दुष्काळ पडला होता. त्याची कारणे शोधण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी त्यांनी सलग दोन वेळा संस्थानचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उत्तम प्रकारचे जल व्यवस्थापन केले होते. (farmers) त्याचा अभ्यास जल व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून केला जात नाही हे दुर्दैव आहे. संस्कृती विना जल आणि जलविना संस्कृती ही बाब अशक्य आहे. कृषी आणि पाणी यांचे अतूट नाते आहे. देशाचे आणि राज्याचे अर्थकारण पावसावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. दुष्काळामुळे विकासाची गती मंद होते. जलसाक्षरता, जल संवर्धन, पाणी वाटप आणि साठवणूक याबद्दल प्रभावी प्रबोधन केले जात नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर कोल्हापूर शहराचे देता येईल. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दूधगंगा अर्थात काळम्मावाडी धरणातून रोज 220 एम एल डी पाण्याचा उपसा केला जातो मात्र 50 एम एल डी पाण्याचे बिलिंग केले जाते. तर मग सुमारे 70 टक्के पाणी जाते कुठे? याचा गेल्या अनेक वर्षांपासून शोध घेतला जात नाही. आजही तीच परिस्थिती आहे.
इसवी सन 1972 मध्ये 47 पॉईंट 29 लाख हेक्टर पेरणी झाली होती. सध्या मात्र 14 लाख 74 हजार हेक्टर मध्ये पेरणी झाली होती. या आकडेवारीवरून दुष्काळाची भीषणता लक्षात येऊ शकते. पर्जन्यमान कमी आणि लोकसंख्या याचा ताळमेळ बसत नाही. 1987 मध्ये देशव्यापी दुष्काळ सदृश्य स्थिती होती. पावसाचे प्रमाण कमी होणे, पाणी टंचाई निर्माण होणे, सिंचन अ सुविधा, आणि अनिश्चितता याचा फटका अधून मधून शेतकऱ्यांना बसतो आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील पाच लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत असे एका अहवालाच्या आधारे म्हटले होते. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करताना दिसतो आहे. एक शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्याचे कुटुंब उध्वस्त होत असते. अशा उध्वस्त कुटुंबांची संख्या दिवसागणित वाढू लागली आहे.
महाराष्ट्राची एकूण भाऊबलीक स्थिती पाहता जास्तीत जास्त 30 टक्क्यांपर्यंत जमीन ओलिताखाली आणता येऊ शकते हे वास्तव आहे. त्यामुळे उर्वरित जमीन ओलिताखाली आणण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना अपेक्षित आहेत. त्या केल्या जात नाहीत आणि म्हणून मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी लहरी पावसावर अवलंबून आहे. राज्यातील अभयारण्ये तसेच अन्य जंगले येथील वन्य प्राण्यांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे. वन्य प्राण्यांसाठी असलेली जल स्थळे कोरडीठाक पडली आहेत. तेथे पाण्याचे टँकर पोहोचलेले नाहीत आणि म्हणून या वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधासाठी भटकंती सुरू आहे. शेकडो टँकरच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या केला जातो आहे.
पाण्याचा गैरवापर टाळला पाहिजे. टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या पाण्याने धुणे यावर बंदी घातली आहे. (farmers) त्यासाठी दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. इतकेच काय घरासमोर पाण्याचा सडा घालण्यावरही प्रतिबंध केला गेला आहे. पण तरीही जलसाक्षरता आलेली आहे असे चित्र दुर्दैवाने कुठे दिसत नाही. भविष्यात इंधनासाठी खनिजासाठी, युद्धे होणार नाहीत तर ती पिण्याच्या पाण्यासाठी होतील असा इशारा फार पूर्वीपासून मानवाला दिला जातो आहे. यंदाच्या दुष्काळात सर्वसामान्य जनतेला पाण्याचे महत्व कळाले असले तरी, तो पाण्यासाठी सजग असे म्हणता येणार नाही. पुन्हा चांगला पाऊस झाला, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला की माणूस पूर्वीचा दुष्काळ विसरून जातो. वास्तविक पाणी वापरताना ते त्याच्या नजरेसमोर दुष्काळाचे चित्र असले पाहिजे.
हेही वाचा :
मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय