न्यायालय परिसरातील थरार पहिल्यांदाच घडतय असे नाही

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

पुणे येथे शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भर दिवसा, गर्दी आम्ही वर्दळीच्या ठिकाणी एका गुंडावर त्या जणांच्या टोळीने गोळ्या झाडल्या. कोयत्याने हात तोडण्याचा रक्तरंजित थरार घडल्यानंतर खळबळ उडणे स्वाभाविक आहे. कोर्ट परिसरही आता सुरक्षित नाही. पोलिसांचा धाक उरला नाही. पोलीस काय करतात? अशा प्रतिक्रिया अगदी गांभीर्याने व्यक्त होऊ लागल्या आहेत. पण असे गुन्हे वारंवार घडतात असे नाही. क्वचितच घडतात. (daylight) त्यामुळे एकदम पोलीस प्रशासनावर तुटून पडणे योग्य ठरत नाही. असे प्रकार गेले 40 वर्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके मुंबई, पंढरपूर, कोल्हापूर वगैरे शहरातही घडलेले आहेत.

पुणे शहरात गेल्या काही वर्षात गुंड टोळ्यांची दहशत प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे हे वास्तव नाकारता येत नाही. शिवाजीनगर न्यायालय परिसरात मंदार मारुती किवळे या खून प्रकरणातील संशयित आरोपीवर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीने प्राण घातला केला. पहिल्यांदा गोळ्या झाडल्या. (daylight) त्याचा उपयोग झालेला नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोयते काढले आणि कोयत्यांने वीस पेक्षा अधिक वार केले. पक्षकार, वकील आणि पोलीस यांची वर्दळ असलेल्या परिसरात हा भयंकर प्रकार घडल्यानंतर, गुंड डोळ्यांची दहशत किती वाढलेली आहे हे सांगण्यासाठी म्हणून तिचा आधार घेतला जातो आहे.”बघा, आता कोर्ट परिसरही सुरक्षित राहिला नाही”ही प्रतिक्रिया हा त्याचाच एक भाग आहे.

सुमारे 40 वर्षांपूर्वी विठू माऊलीच्या पंढरपुरात अनिल डोंबे व त्याच्या कुटुंबीयांची प्रचंड दहशत होती. केळकर नामक अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी या डोंबे बंधूं विरोधी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर दुसऱ्या एका टोळीने डोंबे कुटुंबातील सात जणांना ठार मारले होते. गोष्ट इथेच संपत नाही. डोंबे तुळशी संबंधित एका खटल्याची पंढरपूर न्यायालयात सुनावणी सुरू होती. विटनेस बॉक्स मध्ये एक जण आपली साक्ष नोंदवत होता. नेमक्या त्याच वेळी अनिल डोंबे टोळीतील एक जण न्यायालयात घुसला आणि विटनेस बॉक्समध्ये उभा राहून साक्ष देणाऱ्यांवर न्यायाधीशांसमोर तलवारीने हल्ला केला. या घटनेने तेव्हा अवघा महाराष्ट्र हादरला होता. नंतर अशाच प्रकारचा कोर्ट ड्रामा”अंधा कानून”या चित्रपटात दाखवला होता आशय मात्र थोडासा वेगळा होता.

मुंबई महानगरात टोळी युद्ध भडकले होते. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, करीम लाला, त्याचे पुतणे सलीमजादा,आलमझेब, के टी थापा, ढोलकीया बंधू अशा गुंडांच्या टोळ्यांमध्ये युद्ध सुरू होते. दिवसाढवळ्या गोळीबार केला जात होता. करीम लाला चा पुतण्या आलमझेब, त्याच्यावरील एका केस च्या संदर्भात मुंबई जिल्हा व सत्र न्यायालयात आला होता. तेव्हा दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सफालीगा नावाचा एक गुंड वकिलाच्या ड्रेस कोड मध्ये न्यायालयात आला होता. (daylight) त्याने न्यायालयाच्या कॉरिडॉर मध्ये आलमझेब याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. न्यायालयीन आवारातून तो पळून जात असताना न्यायालयाच्या इमारतीमध्येच तत्कालीन पोलीस निरीक्षक इसाक बागवान यांनी सफालीगा याच्यावर सर्विस रिवाल्वर मधून गोळी झाडून त्याचा खात्मा केला होता. तेव्हाही या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आणि तेव्हाही आजच्यासारखीच कोर्ट परिसर आता सुरक्षित राहिला नाही अशी चर्चा झाली होती.

कोल्हापुरातील एक तरुण सुरेश तुरुंबेकर याच्यावर एका गुंड टोळीने हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयाच्या अपघात विभागात उपचार सुरू असताना याच टोळीने बेडवर झोपलेल्या सुरेश तुरंबेकर याच्यावर पुन्हा हल्ला करून त्याला ठार मारले होते. या घटनेने ही महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी नंतर निर्दोष सुटले आणि त्यातील काही जण महापालिकेचे नगरसेवक ही झाले होते. पुणे येथील कुविख्यात गजा मारणे टोळीतील एक प्रमुख संशयित आरोपी त्याच्या इतर कोल्हापूरच्या मध्यवर्ती कळंबा कारागृहात अंडर ट्रायल होता. सोमप्रसाद पाटील या नावाचा संशयित आरोपी सीपीआर रुग्णालयाच्या कैदी वार्डाच्या परिसरातील छतावर कोल्हापुरातील काही गुंडांसह मद्यपान आणि संगीत पार्टी करीत असताना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून पकडले होते. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी कशाप्रकारे चैन करत होता हे या घटनेतून पुढे आले होते. तेव्हा कोल्हापुरातही खळबळ मारली होती.अशा घटना अपवादात्मक घडत असतात. मात्र त्याचा उल्लेख गुन्हेगारी किती वाढली आहे आणि तिची तीव्रता किती आहे हे सांगण्यासाठी एक उदाहरण म्हणून केला जातो. गुंडांची दहशत प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. पण त्याला पोलीस हा एकमेव घटक जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या