डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने खासदारांची बैठक बोलावली आहे.
डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डिलिमिटेशन विधयेकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर आता ‘एनडीए’तील घटक पक्षात घडामोडी वाढल्या आहेत. (Political) डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने खासदारांना वळवण्यासाठी भाजपला जुळवाजुळव करावी लागणार आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे हे सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनातील पक्षाची भूमिका आणि संसदीय कामकाजासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून 28 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी २ वाजता नंदनवन या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील दुरुस्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. (Political) यामुळे सरसकट ५० टक्के जागा वाढवल्या जाणार आहेत. पंचवीस वर्षांपर्यंत मतदारसंघ पुनर्रचना करता येणार नाही. सध्या लोकसभेच्या जागा या 543 इतक्या आहेत. 50 टक्के जागा वाढल्यानंतर एकूण जागा 815 इतक्या होणार आहेत. तामिळनाडू राज्यात राज्यसभेच्या जागा 39 इतक्या आहेत. विधयेकाचं रुंपातर कायद्यत झाल्यानंतर तामिळनाडूतील लोकसभेच्या जागा 60 होतील. त्यामुळे या विधेयकाल स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष देखील मंजुरी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या सध्या एकूण 48 जागा आहेत. विधेयक मंजूर झाल्यानंतर 72 जागा होतील.
दरम्यान, डिलिमिटेशन बिलावरुन अनेक राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. समाजवादी पक्षानेही या विधेयकाला विरोध केला आहे. दक्षिणेतील डीएमके आणि बीआरएसने काही अटींवर पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. हे विधेयक संविधानावर आघात असल्याचे म्हटलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केलेली नाही. (Political) त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख