सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाने दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. २७ नोव्हेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. (Milk) विशेष म्हणजे, वर्षभरात चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ करण्यात आली असून, गेल्या वर्षभरात दूध एकूण आठ रुपयांनी महागले आहे.
जळगाव जिल्ह्यात दुधाच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या दैनंदिन बजेटवर होणार आहे. गेल्या दीड महिन्यातच दुधाच्या दरात दोन वेळा वाढ झाल्याने दूध प्रति लिटर चार रुपयांनी महागले आहे. आता पुन्हा दोन रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

दुधाच्या दरवाढीमागे दुष्काळी परिस्थिती हे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळामुळे दूध उत्पादनात घट झाली असून, दुधाची आवक जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी बाजारपेठेत दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. (Milk) याचा परिणाम विक्री दरांवर झाला आहे. याशिवाय दूध खरेदीचे वाढलेले दर, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, डिझेलच्या किमती आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे दूध संघावर आर्थिक भार वाढला आहे. हा वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी विक्री दरात वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाने यापूर्वी २७ फेब्रुवारी, १२ ऑगस्ट आणि ११ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी दोन रुपयांची दरवाढ केली होती. आता २७ नोव्हेंबरपासून पुन्हा दोन रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. (Milk) त्यामुळे वर्षभरात एकूण चार वेळा दूध महागले आहे. दरम्यान, या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत काहीसा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे. दुधाचे दर वाढल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच चहा आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरांवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता दूध विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक काय निर्णय घेतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख