सत्ता आणि सत्व परीक्षा सरकार उत्तीर्ण होईल

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

डिलिमिटेशन आणि महिलांना 33 टक्के आरक्षण हा भारतीय जनता पक्षाचा जिव्हाळ्याचा विषय नव्हे तर राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा अजेंडा आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या चार दिवसांच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक दोन तृतीयांश मतांनी पारित झाले तर त्याचे दूरगामी परिणाम होऊन देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाची समीकरणे सुद्धा बदलणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर विशेष घडामोडी घडतील. (politically) सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी कमकुवत होणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांनी विधेयकांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे, आणि ती फार आश्चर्यकारक आहे असे म्हणता येणार नाही.

इसवी सन 1978 मध्ये महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग करणाऱ्या आणि नंतरच्या काळातही राजकीय अस्पृश्यता मी पाळत नाही अशी भूमिका जाहीरपणे मांडणाऱ्या शरद पवार यांनी इसवी सन 2014 मध्ये अल्पमतात असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. आणि 2019 च्या पहाटेच्या शपथविधीसही त्यांची मूकसंमती होती हे नंतर स्पष्ट झाले होते. अटल बिहारी बाष्पी यांचे 13 दिवसांचे सरकार सोनिया गांधी व जैवविविधता यांच्या ” टी डिप्लोमसी”नंतर कोसळले होते. (politically) त्यामध्ये शरद पवार हेच होते हे नंतर स्पष्ट झाले.2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी म्हणून शरद पवार यांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे असे सांगत महाविकास आघाडीचे सरकार आणले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना त्यांनी केव्हा मुख्यमंत्री बनवले. तेव्हा त्यांनी भाजपला जातीयवादी पक्ष ठरवले होते. नंतर त्यांचाच पक्ष अजित दादा पवार यांनी हाय जॅक केल्यानंतर शरद पवार यांची राजकीय अवस्था शौचनीय झाले होती. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी गेल्या वेळच्या विशेष अधिवेशनात दिन लिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक मांडले होते. तेव्हा याच शरद पवार यांनी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता मात्र त्यांना हे विधेयक संवैधानिक आहे आणि ते आज किंवा उद्या मंजूर करावेच लागेल असा साक्षात्कार झाला आहे.

शरद पवार यांची बदललेली भूमिका म्हणजे त्यांचा भाजप प्रणित एनडीए कडे जाण्याचा प्रवास सुरू झाला आहे. याचा अर्थ नजीकच्या काही दिवसात शरद पवार गट हा महाराष्ट्रात महायुतीत जाईल असा होतो. सत्तेत नसताना पक्ष चालवणे कठीण जाते असे त्यांच्या पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतच होते. आता हा पक्ष सत्तेत जाईल. शरद पवार हे आपले दैवत आहे. मी त्यांना गुरुस्थानी मानतो असे अधून मधून सांगणाऱ्या खासदार संजय राऊत यांची अवस्था अगदीच केविलवाणी झाली आहे. शरद पवार हे केव्हाही जातीयवादी भारतीय जनता पक्षाकडे झुकणार नाहीत असा विश्वास ते बोलून दाखवत असत. बऱ्याचदा ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत की काय असा संभ्रम महाराष्ट्राला पडला होता. डिलिमिटेशन विधेयकाला जय पाठिंबा देतील ते सर्व खासदार गद्दार असतील असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला गद्दार ठरवत आहेत असा होतो. शरद पवार गट हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना राजकीय भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आहे. हे संजय राऊत विसरत आहेत असे दिसते.

गेल्या संसदीय अधिवेशनात डी लिमिटेशन विधेयक ना मंजूर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा हाताची घडी घालून स्वस्त बसलेला नव्हता. कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करून घ्यायचेच असा निर्धार करून इतर काही पक्षातील खासदार फोडण्याचा व्यवहार (politically) त्यांच्याकडून सुरू होता.हे विधेयक संमत होण्यासाठी 362 मतांची आवश्यकता आहे आणि आज 355 मतांची गोळाबेरीज करण्यात त्यांना यश मिळालेले आहे. आणखी काही मतांची गरज ते कोणत्या प्रकारे भागवतात यावर बरेच काही अवलंबून आहे. 2029 नंतरही केंद्रात भाजपचेच सरकार असले पाहिजे किंवा आले पाहिजे यासाठी हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासाठी ही सत्ता आणि सत्वपरीक्षा आहे. या परीक्षेत ते उत्तीर्ण होणार काय? याचे उत्तर या विशेष अधिवेशनातच मिळणार आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या