पवार गटाच्या आमदार, खासदारांत मोठी खदखद, थेट दोन गट पडले पडद्यामागे एकनाथ शिंदेंशी

सूत्रांच्या माहितीनुसार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं काही आमदार, खासदार नाराज आहेत.

सध्या देशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची देशभरात चर्चा सुरू आहे. कायम विरोधात असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या विधेयकाच्या बाबतीत एनडीएला पाठिंबा देणार आहे.(Nationalist) पवार गट इंडिया आघाडीचा भाग आहे. या विधेयकावर भूमिका ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीलाही पवार गट उपस्थित राहणार आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या तसेच देशाच्या राजधानीत मोटी खळबळ उडाली आहे. पवार गटाचे खासदार या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पवार गटामधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधेयकावरून पवार गटातच दोन गट पडल्याचे सूत्रांनी सांगितलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं काही आमदार, खासदार नाराज आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पक्षाची असलेल्या संस्पेन्स भूमिकेनं काही नेत्यांच्या मनात खदखद आहे. आधीच विलनीकरणाच्या चर्चेनं पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे. (Nationalist) त्यानंतर आता या विधेयकावरूनही अद्याप सस्पेन्स आहे. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने नेत्यामध्ये नाराजी आहे.

याबात काही आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदेकडे नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक खासदार आणि दोन आमदारांनी एकनाथ शिंदेकडे आपली ही खदखद व्यक्त केली आहे. ठाकरे गटानंतर शरद पवार गटाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुले आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांचे खासदार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आता पवार गटाच्या भूमिकेबाबतचा स्पेन्स वाढला आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून पवार गटावर थेट टीका केली जातेय. पवार यांना सत्तेत जायचे वेध लागले आहेत, असे खडे बोल काँग्रेसने सुनावले आहेत. (Nationalist) त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या