केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ८व्या (update) वेतन आयोगाबाबत मोठी आणि उत्सुकता वाढवणारी अपडेट समोर येत आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, पगारवाढीचा फॉर्म्युला कसा असू शकतो याबाबत चर्चा जोर धरत आहे. विशेषतः ‘फिटमेंट फॅक्टर’ हा पगार वाढीचा मुख्य आधार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या ७व्या वेतन (update) आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर लागू आहे, मात्र ८व्या वेतन आयोगात तो 3.00 किंवा त्याहून अधिक असू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या फॉर्म्युल्यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये असेल, तर तो थेट 54,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पगारात तब्बल 30 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
त्याचबरोबर महागाई भत्ता (update) आणि इतर भत्त्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एकूण पगारात आणखी वाढ होईल.दरम्यान, तज्ञांच्या मते, महागाई, आर्थिक स्थिती आणि सरकारी तिजोरीवरील ताण लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे प्रत्यक्षात किती वाढ होईल, याबाबत स्पष्टता अधिकृत घोषणेनंतरच मिळणार आहे. तरीही, लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आता ८व्या वेतन आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे.