महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभाग मध्ये तब्बल 8,669 पदांची मेगाभरती होणार असल्याची घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर होत असलेल्या या भरतीमुळे हजारो उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
राज्य शासनाने विभागाच्या सक्षमीकरणासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, (government job )यामुळे महिला व बालकल्याणाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीला मोठी गती मिळणार आहे. या भरतीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विभागातील कामकाजाचा आढावा घेत काही जुनी पदे रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी 165 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे एकूण मंजूर पदांची संख्या 8,669 इतकी झाली आहे. याशिवाय तातडीच्या कामांसाठी 2,843 पदे आउटसोर्सिंग पद्धतीने भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
हा निर्णय विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नव्या पदांमुळे विविध योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने आणि परिणामकारकपणे होणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिक बळकट करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (government job) याअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि तितक्याच संख्येने मदतनीस, अशी एकूण 2,21,328 मानधनाधारित पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला व बालकांच्या पोषण, आरोग्य आणि विकासाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार आहे. विशेषतः अंगणवाडी व्यवस्थेला मोठं बळ मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “23 वर्षांनंतर घेतलेला हा निर्णय विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. (government job)यामुळे महिला आणि बालकल्याणाच्या योजनांना गती मिळेल आणि लाभार्थ्यांपर्यंत सेवा अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतील.”
हेही वाचा
SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार
सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत
GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?