बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन, वैशिष्ट्ये काय?

मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकलवरील गर्दी हा नेहमी चर्चेचा विषय असतो. लोकलमधील प्रवास एखाद्या युद्धावर जाण्यापेक्षा नक्कीच कमी नसतो. हा धाडसी प्रवास लाखो मुंबईकर रोज करतात. सुरक्षित प्रवासासाठी आता बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन धावणार आहे, काय आहे तिचे वैशिष्ट्ये?

मुंबईतीलच नाही तर भारतातील पहिली नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल ट्रेन धावणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. ही रेल्वे 12 कोचची आहे. या लोकलचा क्रमांक 268201-268212 असा आहे. हा भारतीय रेल्वेतील एक खास प्रोटोटाईप आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना अधिक लोकलची गरज आहे. लोकलवरील गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो आणि पाण्यावरील टॅक्सीचाही प्रयोग करण्यात येत आहे. (traveling) त्यासोबतच लोकलचा प्रवास सुरक्षित करण्यावर भर देण्यात येत आहे.

चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये या ट्रेनचे खास डिझाईन तयार करण्यात आले आहे. ही एक वेस्टिब्युल ट्रेन आहे. त्यामध्ये सहा सहा डब्बे असतील. सहा डब्ब्यांचे दोन युनिट आहेत. एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात जाता येईल. महिलांसाठी आरक्षित डब्बे असतील. या रेल्वेत कोणताही फर्स्ट क्लास डब्बा नसेल. या बंद दरवाज्याच्या नॉन एसी रेल्वेमुळे सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे. कुणालाही दरवाजात लटकता येणार नाही.सर्वात मोठे आव्हान हे या डब्ब्यातील हवा येण्याविषयीचे आहे. पण चिंता करण्याची गरज नाही. या नॉन एसी डब्ब्यांच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स लावण्यात आले आहे. छतावर ब्लोअर्स लावण्यात आले आहेत. (traveling) त्यातून सातत्याने ताजी हवा येत राहील आणि प्रवाशांना दमटपणाचा त्रास होणार नाही. खेळती हवा असेल. विशेष म्हणजे पावसाळ्यात या ब्लोअर्सच्या डिझाईनमुळे पावसाचे पाणीही डब्ब्यात शिरणार नाही.

अत्यंत गर्दीच्या वेळी ही नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल धावेल. या लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बंद करण्याची सिस्टिम आहे. यामध्ये सेन्सर, टॉकबॅक, प्रवाशांसाठी स्टेशनची माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड असेल. तर डब्ब्यात कार्बन डायऑक्साईड जमा होऊ नये ( traveling) यासाठी खास सुविधा आणि सोय करण्यात आली आहे. ही लोकल कधी धावणार याविषयीची मुंबईकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पण त्यासाठी प्रवाशांना अजून काही महिने लागू शकतात. या लोकलच्या काही चाचण्या अद्याप बाकी आहे. त्यानंतर ही लोकल धावेल.

हेही वाचा

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?