आता चूक सुधारता येणार, इंस्टाग्रामने लाँच केले नवे एडिट फिचर, काय असणार यात वाचा

(Instagram) ने आपल्या प्लॅटफॉर्मवर एका नवीन फिचरचा समावेश केला आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सना त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळणार आहे. काय आहे हे नवीन फिचर्स पाहूयात

लोकप्रिय सोशल साईट इंस्टाग्रामने अखेर ते फिचर लाँच केले आहे. या फिचरची लोक खूप काळापासून वाट पाहात होते. या नवीन फिचरच्या मदतीने युजर्स आणि क्रिएटर्स आता त्यांच्या कमेंटला पोस्ट केल्यानंतर देखील एडिट करु शकणार आहेत. आधी आपल्याकडून पोस्टवर चुकीची कमेंट होते तेव्हा ती दुरुस्त करता येत नव्हती. आता इंस्टाग्रामच्या नव्या फिचरच्या मदतीने या चुकीला सुधारण्याची संधी मिळणार आहे. यात युजर टाईपो किंवा आपली चुक सुधारु शकणार आहेत.

इंस्टाग्रामने जारी केलेले हे फिचर केवळ १५ मिनिटे काम करणार आहे. (lnstagram) म्हणजेच युजर कमेंट केल्यानंतर १५ मिनिटाच्या आतच कमेंट एडिट करु शकणार आहेत.इंस्टाग्राम एडिट टॅगला यासाठी वापरणार आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्सपरन्सी कायम रहावी. जर कोणताही युजर त्याची कमेंट एडिट करत असेल बाकी लोकांना हे दिसायला हवे की कमेंट एडिट केलेली आहे.

कमेंट अपडेट करण्यासाठी हे नियम पाळावे लागणार
कमेंट एडिटसाठी १५ मिनिटांचा कालावधी मिळेल
कमेंटला अनलिमिटेड एडिट्स करता येणार
ए़डिटची सुविधा केवळ टेक्स्टवर लागू आहे
कमेंटमध्ये जर फोटो आदी असेल तर त्याला एडिट करता येणार नाही.
एडिट केलेल्या कमेंटवर एडिट्सचा टॅग दिसणार आहे

पोस्ट केलेली कमेंट कशी एटिड करता येणार
इंस्टाग्राम पोस्टवर केल्या गेलेल्या कमेंटला एडिट करणे सोपे असणार आहे.यासाठी युजरला कमेंटवर काही वेळ टॅप करुन वाट पाहावी लागेल.त्यानंतर स्क्रीनवर नवा ऑप्शन येईल. ज्यात एडिटचा ऑप्शन देखील असेल. ( lnstagram) त्यावर क्लिक करावे लागणार आहे.येथे चुकीची कमेंट एडिट करु सुधारता येणार आहे.

एकदा का कमेंटवर एडिट केले की त्यावर एडिटेड टॅग नजरेस येणार आहे.एकदा का एडिट केले की कोणताही युजर्स ओरिजनल कमेंट पाहू शकणार नाही.

हेही वाचा

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?