पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जुलैमध्ये; शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 23 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (farmers)आतापर्यंत 22 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता पुढील हप्त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या योजनेत केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. (farmers)त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून शेतीच्या कामांसाठीही मदत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जुलै महिन्यात वितरित होण्याची शक्यता आहे. (Farmers) त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप काही कारणांमुळे लाभ मिळालेला नाही, त्यांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे अत्यावश्यक आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणेही अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्ता अडकू शकतो. शेतकरी आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात.
सरकारकडून वारंवार सूचना दिल्या जात असून, सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. जुलै महिन्यात हप्ता जमा होणार असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
हेही वाचा
SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार
सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत
GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?
